दत्तवाड ग्राम विकास सेवा सोसायटी मार्फत सभासदांना दहा टक्के लाभांश वाटप
दत्तवाड.
येथील दत्तवाड ग्राम विकास सेवा सोसायटी मार्फत सभासदांना दहा टक्के लाभांश व ठेवीवर आठ टक्के व्याजाचे वाटप चेअरमन मलगोडा पाटील व्हा .चेअरमन विरूपाक्ष हेरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चेअरमन मलगोंडा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सभासदांच्या हितासाठी काटकसरीने संस्था चालवून सभासदांना जास्तीत लाभांश देण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे सांगितले संचालक एन एस पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
संस्थेची स्थापना १९४७ साली झाली आहे. दरवर्षी सभासदांना लाभांश देण्यात येतो. दसऱ्यापूर्वी सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले यामुळे सभासद शेतकऱ्यांच्या दसरा गोड झाला आहे.
यावेळी संचालक बाबासो सिदगोडा पाटील, विरगोडा शिवगोंडा पाटील, आलगोंडा बाळगोडा पाटील, निगोंडा सिदगोंडा पाटील, बाबासो बंडा माने, धोंडीराम मारुती माने, गोरख कृष्णा कांबळे, मंगल श्रीपाल चौगुले, सुवर्णा बाळगोंडा पाटील, रावसो अण्णासो पाटील उदय काकासो पाटील ,कलगोंडा बाळगोंडा पाटील, सचिव राजगोंडा बाबासो पाटील, कर्मचारी राजगोडा पिरगोंडा पाटील, मलगुंडा बसगोडा पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते.