नवरात्र शारदोत्सव निमित्त हळदीकुंकू व पानसुपारीचा कार्यक्रम
कुरुंदवाड (प्रतिनिधी):---
शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडच्या कै. डॅा.रामचंद्र विठ्ठल फडणीस व कै. सौ. जानकीबाई रामचंद्र फडणीस प्राथमिक विद्या मंदिर कुरुंदवाड येथे (ता.शिरोळ)नवरात्र शारदोत्सव निमित्त हळदीकुंकू व पान सुपारीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथितयश बालरोगतज्ञ डॉ. अभिजीत ज.भरमगोंडा डॉ.अस्मिता अ. भरमगोंडा होत्या. पाहुण्यांच्या शुभहस्ते शारदा देवीचे पूजन करण्यात आले. नटून-थटून आलेल्या इयत्ता चौथीतील विद्यार्थिनींनी पाहुण्यांचे व सर्व पालकांचे स्वागत केले.
डॉ . भरमगोंडा म्हणाले की इंग्रजी मिडीयम आणि मराठी मिडीयम यातील संस्कार आणि संस्कृती यामध्ये फार फरक आहे. आपल्या भारतीय संस्कृती आणि सणाला इव्हेंट म्हणून पाहतात. तर खऱ्या अर्थाने संस्कार आणि संस्कृती मराठी शाळेतच होतात. असे गौरवोद्गार पाहुण्यांनी काढले. त्याचबरोबर आपला व्यवसाय हे जगायला शिकवते तर कोणतीही कला जीवन कसे जगावे हे शिकवते असेही यावेळी सांगितले. या शारदोत्सव निमित्त बालवाडी ते इयत्ता चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेतुन नाविन्याची निर्मिती केलेले हस्तकला प्रदर्शनही मांडण्यात आले होते. त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा घेऊन नंबरही काढण्यात आले. रांगोळीचे परीक्षण पाटील यांनी केले.या कार्यक्रमाच्या वेळी स्त्री पालकांच्यासाठी हळदी कुंकू व पुरुष पालकांच्यासाठी पानसुपारी देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन .प्रा.शरदचंद्र पराडकर व संस्थेच्या सेक्रेटरी सीमा जमदग्नी यांची प्रेरणा व स्फूर्ती मिळाली तर विश्वस्त श्रद्धा कुलकर्णी उपस्थित होत्या.
या शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी काळे , कांचनमाला बाबर , अनिल पांडव, दत्तात्रय कुरुंदवाडे , अनिता भोई , मिरामा बाणदार, सुनील पवार , रेखा
औरवाडे , चंद्रकला बालक मंदिर च्या मुख्याध्यापिका निला कुलकर्णी व त्यांचा स्टाफ माळभाग पालक मंदिर च्या मुख्याध्यापिका गायकवाड व त्यांचा स्टाफ , मालूताई गुरव , बहुसंख्येने पालक उपस्थित होते. विद्यासागर उळागड्डे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले