मंदा देशपांडे यांना राष्ट्रीय कलारत्न पुरस्कार प्रदान
दत्तवाड.
प्रेस मीडिया लाईव्ह पुणे यांचा राष्ट्रीय कलारत्न पुरस्कार दतवाड ता. शिरोळ येथील मंदा मिलिंद देशपांडे यांना इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनी सभागृहात शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, इचलकरंजी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजीव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजवादी प्रबोधिनी सचिव प्रसाद कुलकर्णी होते.
मंदा देशपांडे या कुरुंदवाड येथील साने गुरुजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आहेत त्यांनी हायस्कूलमध्ये असतानाच विविध नाटकात व नृत्य प्रकारात भाग घेवून बक्षीस मिळवले आहे. त्याबरोबरच कॉलेज मध्ये असताना नाटक ,नृत्य,पथनाट्य, यात भाग घेऊन कला सादर केली आहे. तर महाराष्ट्राची संस्कृती दर्शन या अंतर्गत गोवा राज्य व आंध्र प्रदेश राज्य येथे लावणी नृत्य सादर केले आहे. दूरदर्शनवरील कार्यक्रमातही त्यांनी भाग घेतला आहे. लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित पूर्व प्राथमिक प्राथमिक शाळा दत्तवाड येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत .
त्या नृत्य प्रशिक्षक म्हणून काम करत असून त्यांचा त्यांचा कलाक्षेत्रात असणारा अनुभव लक्षात घेऊन लाईव्ह मीडिया पुणे यांनी यावर्षीचा राष्ट्रीय कला रत्न पुरस्कार 2023 त्यांना प्रदान केला.
यावेळी . अॅड. विश्वास पांडुरंग चुडमुंगे इचलकरंजी ,दगडु माने शिरोळ, केदार कुलकर्णी (चित्रपट निर्माता) युसुफ तासगावे (समाजसेवक) ; पद्मजा खटावकर (अभिनेत्री); भाऊसाहेब फास्के (जेष्ठ पत्रकार); फिरोज मुल्ला, प्रेस मीडिया लाईव्हचे मुख्य संपादक . मेहबूब सर्जेखान आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.