शिक्षकांनी सामाजिक भान म्हणून मुलांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता -ना. हसन मुश्रीफ.
कागल :
मा. हसनसो मुश्रीफ फौंडेशन,कागल यांच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींना वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ म्हणाले, आयुष्यभर ज्ञानदानाचे काम करीत असताना पाठीवर थाप मारण्याची अपेक्षा असते.ती अपेक्षा फौंडेशनच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे काम सुरु आहे.खाजगी शाळांचे पेव फुटलेले असताना पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे आहे.पालकांना मुलांच्या शिक्षणाची गॅरंटी वाटली पाहिजे. असे काम करणे गरजेचे आहे. शिक्षणाची गळती,समायोजनासारखे गंभीर प्रश्न होते.विविध प्रकारे त्यांप्रश्नांची सोडवणूक केली. ज्ञानदान करीत असताना RTE कलमांनुसार चांगले काम करा. हिमालयांसारखे आम्ही शिक्षकांच्या मागे राहू. काळानुरूप आपणाला बदलावे लागेल.मुलांवर लक्ष ठेवण्याचे सामाजिक भान ठेवण्याची आवश्यकता आहे.कागल तालुक्यातील गुणवत्ता दाखवून दिल्याबद्दल ज्यांनी ज्यांनी काम केले त्यांचे मनपूर्वक अभिनंदन.
प्रमुख पाहुणे शिक्षक आमदार विक्रम काळे म्हणाले, -कागलच्या भूमीला वेगळे महत्व आहे.ही राजर्षि शाहूंची जन्मभूमी आहे.समाजसुधारक ना.गोपाळकृष्ण गोखले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी येथे शिक्षण घेतले.गोरगरिब, सर्वसामान्यांचे श्रावणबाळ म्हणून ओळखणारे ना.हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षणमंत्री काम करीत असतांना कामांचे हिशोब ठेवणे महत्वाचे आहे.सध्या मार्केटींगचा जमाना आहे.कागलचा विकास करण्यासाठी एकोप्याने कार्य करण्याची अपेक्षा आहे.
मुश्रीफांसारखे नेतृत्त्वाला संधी देणे महत्वाचे आहे. शिक्षकांना समाजाचा शिल्पकार आहे.तुमच्या हातात पिढी घडविण्याचे जबाबदारी आहे त्यामुळे नेहमी अपडेट असणे आवश्यक आहे.पुरस्काराने जबाबदारी वाढली आहे.आज शिक्षकांबद्दल चांगले बोलले जात नाही त्यामध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. समाजाचे बारकाईने लक्ष शिक्षकांवर असते.शाळा हे मंदिर,टीमवर्क आहे.हे माझं आहे असे समजून कार्य करा.आज मुलांना सोन्यासारखा भाव आहे. मुले आणणे ही आपली जबाबदारी आहे.आणि ते टिकविण्याची विनंती त्यांनी केली.
शाळा कोणत्याही संस्थेला कंत्राटी दिली जाणार नाही.भौतिक सुविधा पुरविण्यासाठीच खाजगी संस्थेचा सीएसआर फंड वापरला जाणारआहे.पुरस्कार प्राप्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षस्थानावरून बोलताना खा.संजयदादा मंडलिक म्हणाले,नवरात्रीच्या जागरणादिवशी इतकी गर्दी पाहून शिक्षण विकासाचा जागर आहे.शहीदांच्या मुलांना मदत, गरजूंना वैद्यकीय मदत,पूरग्रस्तांना मदत देण्याचे कार्य मुश्रीफ फोडेंशन करीत आहे. शिक्षणाचे महत्व लक्षात घेता राज्यात कागल तालुका प्रथम आहे.आदर्शवत काम झाले आहे. कागल तालुका देशात प्रथम यावा.
यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर म्हणाले,-ना. मुश्रीफ यांनी प्रत्येक घटकांला समाधानी करण्याचे झपाटून काम केले.आज कर्तृत्ववान लोकांकडूनच कर्तृत्ववान व्यक्तीचा सत्कार होत आहेत. राज्यात गुणवत्तेची खाण कोल्हापूर जिल्हयात आहे.शिक्षक होणे नशीबवान समजतो कारण शिक्षकांना कायम सन्मान मिळतोय तो इतर कोणत्याही क्षेत्रात मिळत नाही.
संजय बाबा घाटगे यांनी सांगितले की भ्रष्टाचार मुक्त क्षेत्र शिक्षण आहे. गुरु द्रोणाचार्य उच्च वर्णियांना शिक्षण देत होते पण शिक्षक सर्व घटकांना ज्ञान देण्याचे कार्य करतात. संस्कारासह शिकविण्याचे कार्य केल्यानेच भारत जगात अग्रेसर आहे.
यावेळी ६७ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ३५० शिक्षकांतून आलेल्या प्रस्तावातून ह्या निवडी करण्यात आल्या.याप्रसंगी दादासाहेब लाड, प्रताप उर्फ भैया माने,नाविद मुश्रीफ,वसंतराव धुरे,सतिश पाटील, राजेंद्र माने, बाळासो तुरंबेकर, गटशिक्षणाधिकारी गणपतराव कमळकर,बळवंतराव माने, राजेंद्र पाटील,सुकुमार पाटील, जी.एस.पाटील,के.व्ही.पाटील यांचेसह पुरस्कार प्राप्त शिक्षक,कार्यकर्ते उपस्थित होते.