गोकुळ चेअरमन आंदोलन अंकुश बैठक निष्फळ सोमवार पर्यंत वाट पाहू अन्यथा उग्र आंदोलन करणार : धनाजी चुडमुंगे
कोल्हापूर --
गोकुळ दुध संघाने गाय दुध दर कमी केल्याने व ते दर पूर्वरत करावे म्हणून 16 तारखेला उदगाव चिलिंग सेंटर वर आंदोलन झाले होते त्यावेळी ठरलेनुसार आज गोकुळ चेअरमन संचालक व आंदोलक यांची बैठक झाली पण तोडग्या विना बैठक सपली असून सोमवार पर्यंत दरवाढ न केल्यास गोकुळ विरोधात उग्र आंदोलन करणार असल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.
गोकुळ च्या ताराबाई पार्क येथील मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत दुध उत्पादकांनी आपल्या तीव्र भावना पदाधिकारी यांना सांगितल्या पण गोकुळ चेअरमन यांनी दर वाढीबद्दल कोणतेही भाष्य न करता सोमवार च्या आत सरक्युलर काढून संचालकांची बैठक घेऊन निर्णय सांगतो असे सांगितले.
सोमवार पर्यंत दरवाढ केली नाही तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी शिरोळ तालुक्यातील सर्व दुध उत्पादकांची छत्रपती शिवाजी तक्त शिरोळ येथे दुपारी 1 वाजता बैठक आयोजित केली असल्याचे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.
आजच्या बैठकीत आंदोलन अंकुश चे उदय होगले दीपक पाटील दत्तात्रय जगदाळे आम आदमी चे सुदर्शन कदम यांच्यासह सतीश चव्हाण विशाल चुडमुंगे राजेंद्र घोरपडे सचिन कागवाडे दीपक जगदाळे बंडू संकपाळ सोहेल कुरणे प्रशांत शेट्टी रवींद्र माळी यांनी चर्चेत भाग घेतला.