*दत्तवाड येथे विविध सेवा शिबिराचे उद्घाटन*
दत्तवाड -
दत्तवाड ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त समिती यांच्यामार्फत . सुरेश नं. पाटील, . जिल्हा अध्यक्ष, प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना, जिल्हा सहसंयोजक आत्मनिर्भर भारत तंटामुक्त समिती अध्यक्ष, व सागर बिरणगे आणि शशिकांत घाटगे, यांच्या सहयोगाने मोफत विविध सेवा शिबिराचे उद्घाटन सरपंच चंद्रकांत कांबळे , अजित वठारे व मान्यवरांच्या हस्ते येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार सभागृहात पार पडले .
आपण वाचत आहात जेडी न्यूज.प्रथमच अशा प्रकारचे शिबिर दतवाड येथे होत आहे. या शिबिरात नागरिकांना ५ लाखांचा गोल्डन कार्ड ,पॅनकार्ड, .डी मॅट खाते ,हेल्थ कार्ड (आबा कार्ड). ईश्रम कार्ड, झिरो बॅलन्स बँक खाते या सेवा मिळणार आहेत .
यावेळी डी एन सिदनाळे, नूर काले, देवराज पाटील नाना. नेजे ,संजय पाटील, प्रमोद पाटील, प्रकाश चौगुले अकबर काले ,बसगोडा पाटील ,मलगोंडा पाटील, बाबुराव पोवार, तेजस वराळे विरपाक्ष हेरवाडे, शामराव बिरणगे,अमित माने, विजय घोरपडे ,अजित वठारे अशोक नेर्ले याच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
मोफत शिबिरात मिळणाऱ्या सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान सुरेश पाटील यांनी केले आहे.