दत्तवाडमधील अंगणवाडी व शाळांचे कार्य उत्कृष्ट :सरपंच चंद्रकांत कांबळे
दत्तवाड:
दत्तवाडमधील अंगणवाडी व शाळांचे कार्य उत्कृष्ट असल्याचे प्रतिपादन सरपंच चंद्रकांत कांबळे यांनी केले.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये व अंगणवाडीमधील शिक्षक उच्चशिक्षित असून त्याचा लाभ घेण्यासाठी प्रवेश घ्यावा.असे आवाहनही त्यांनी केले.अंगणवाडी व शाळांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बांबरवाडी,दत्तवाड येथील अंगणवाडी क्रमांक -२११च्या वतीने आयोजित सत्कार समारंभ,महिलांच्या स्पर्धा या प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.यावेळी समाजभूषण पुरस्कार प्राप्त ह.भ.प.बळीराम कृष्णा चव्हाण व ह.भ.प.पांडुरंग बाबू चव्हाण तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका शाहीन पठाण यांचा सत्कार करण्यात आला.
अंगणवाडी पर्यवेक्षिका शाहीन पठाण यांनी अंगणवाडीच्या विविध योजना,बालकांचा सकस आहार यासंबंधी माहिती दिली.
यावेळी आयोजित उखाणे स्पर्धेत मीरा चव्हाण,पूजा कुंभार,कोमल चव्हाण विजेते ठरल्या.तर संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये वर्षा चव्हाण,प्रियंका चव्हाण व उषा चव्हाण यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक पटकावला.
याप्रसंगी दिलीप शिरढोणे यांनी मान्यवरांचा परिचय करुन दिला.बाळासो कोकणे,दिलीप चव्हाण,विद्या कांबळे,रेखा चव्हाण,सरिता राजमाने यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उपसरपंच मनिषा चौगुले,ग्रामपंचायत सदस्या सीमा पाटील,प्रमोद पाटील, संभाजी मोहिते,नारायण पाटील, पांडुरंग बापू चव्हाण,कारदगे यांचेसह पालक,विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाग्यश्री कांबळे यांनी केले.