दत्तवाड --
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेली 'होऊ द्या चर्चा' ही मोहीम दत्तवाड येथील दसरा चौकात संपन्न झाली.
शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या संजनाताई घाडी या प्रमुख उपस्थिती होत्या. आपल्या मनोगतात घाडी म्हणाल्या, २०१४ मध्ये नागरिकांच्या जीवनात सुख- सोयी आणण्याचा मोठा गाजावाजा करून मोदी सरकार सत्तेत आले. परंतु सरकारच्या योजना म्हणजे फक्त बोलघेवड्या घोषणा ठरल्या आहेत. प्रत्यक्षात पेट्रोल- डिझेल दरवाढ, घरगुती खाद्यपदार्थाच्या प्रचंड महागाईमुळे सामान्य नागरिक भरडला जात आहे. फसलेली नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारी वर्ग तसेच शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा सुगीचे दिवस आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आणावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास बाजीराव मालुसरे ( संपर्कप्रमुख), मधुकर पाटील उपजिल्हाप्रमुख, वैभव उगळे शिवसेना तालुकाप्रमुख, युवराज घोरपडे उपतालुकाप्रमुख, प्रतिक धनवडे युवासेना उपजिल्हाप्रमुख, बाबासाहेब नदाफ, निलेश तवंदकर युवासेना तालुकाप्रमुख, बाबासाहेब सावगावे, मंगलताई चव्हाण महिला जिल्हा संघटिका, स्वाती सासणे, वैशाली जुगळे, साजीदा घोरी त्याचबरोबर शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.