शैक्षणिक क्रांती घडविण्यासाठी संघटनांचे योगदान आवश्यक: स.पो.नि फडणीस
दत्तवाड --
समाजातील विविध सामाजिक संघटना या सर्वसामान्य नागरिकांना व सुशिक्षितांना प्रेरणा देण्यासाठी आहेत.या संघटनांचा बहुजन समाजासाठी भविष्यात शैक्षणिक क्रांती घडविण्यासाठी योगदान आवश्यक असल्याचे प्रतिपादन सहाय्याक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी केले.
दतवाड ता.शिरोळ येथील देशभक्त रत्न कुंभार सभागृहात ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या मेळाव्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात सपोनी फडणीस बोलत होते अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी उपसभापती भवानी सिंग घोरपडे सरकार होते. सरपंच चंद्रकांत कांबळे संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कासिम मुल्ला राज्य उपाध्यक्ष एम एस गवंडी जिल्हाध्यक्ष जहांगीर हजरत तालुकाध्यक्ष एजी मुल्ला जिल्हा प्रवक्ते दिलीप कलावंत आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपसभापती भवानी सिंग घोरपडे म्हणाले संघटना स्थापन करत असताना सर्वसामान्य हितासाठी कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्या स्थापन कराव्यात.सुफी,साधू,संतांनी वायफळ खर्च न करता समाज उपयोगी उपक्रम राबवून ते कार्य केल्यास सार्थकी ठरेल असे सांगितले आहे.हेच विचार आचरणात आणून सामाजिक संघटनांनी कार्य करावे असे सांगितले.
राष्ट्रीय उपाध्यक्ष मुल्ला,राज्य उपाध्यक्ष गवंडी, सांगलीचे जिल्हाध्यक्ष युसूफ मेस्त्री, सरपंच चंद्रकांत कांबळे, माजी तंटामुक्त अध्यक्ष बाळासो कोकणे आदींनी भाषणे केली. यावेळी स्वागत तालुकाध्यक्ष ए.जी मुल्ला यांनी केले तर प्रास्ताविक दिलीप कलावंत यांनी केले.
यावेळी प्रगतशील शेतकरी विविध संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा सहसरचिटणीस शहेणशाह मुल्ला,
महिला जिल्हाध्यक्षा नसिमा अत्तार,सांगली महिला जिल्हाध्यक्षा प्रा.शाहीन मुल्ला तालुका उपाध्यक्ष जैनुद्दीन सनदी-पखाली,बशीर मलंग फकीर,जहाँगीर रणमल्ली,सलीम मुजावर,जावेद मुल्ला,बंडू मुल्ला, अकबर शेख,समीर मुजावर,अय्याज पिरजादे,युनूस मुजावर,समीर मुल्ला,रमजान मुल्ला,सिकंदर मुल्ला,असगर खलिफ,जमिर मुजावर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.