राज्याध्यक्ष शिवाजी ठोंबरे यांनी राज्यस्तरावर शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा -चेअरमन सुनिल एडके.
कुरुंदवाड:
महाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्रप्रमुख संघटनेचे राज्याध्यक्ष शिवाजी ठोंबरे यांनी मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी राज्यस्तरावर शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा.असे आवाहन दि प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन सुनिल एडके यांनी केले.
महाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्रप्रमुख संघटनेच्या वतीने शिवाजी ठोंबरे यांचा सत्कार इचलकरंजी महापालिकेचे प्रशासन अधिकारी अजय बिरणगे यांचे शुभहस्ते करण्यात आला.
शिवाजी ठोंबरे यांचे संघटनकौशल्य वाखाणण्याजोगे असल्याचे प्रतिपादन संतोष जुगळे यांनी केले.
शिवाजी ठोंबरे यांनी पदवीधर संघटनेच्या माध्यमातून विषय शिक्षकांच्या प्रश्नांची निर्गत करण्यासाठी प्रयत्न करतील. अशी अपेक्षा भालचंद्र खोत यांनी केली.
शिवाजीराव म्हणजे शिरोळ तालुक्याचे आशास्थान असल्याचे मत सुनिल कळसापन्नावर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी अरुण कदम, दिलीप शिरढोणे,अंकुश ओलेकर,राजेंद्र कोरे,दिपक घाटगे उपस्थित होते.
स्वागत महेश घोटणे यांनी तर मेहबूब मुजावर यांनी आभार मानले.