राज्यभर सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला *भुदरगड तालुका ब्राह्मण जागृती संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा...
मराठा समाजाला ब्राह्मण समाज आपला मोठा भाऊ समजतो. म्हणून आज मोठ्या भावाच्या अडचणीच्या काळात ब्राह्मण समाज संपूर्ण राज्यात तन मन धनाने पाठीशी उभा आहे. ह्याच अनुषंगाने आज भुदरगड तालुक्यातील समस्त ब्राह्मण जागृती संघटनेच्या वतीने मोठ्या संख्येने ब्राह्मण बांधव गारगोटी ता भुदरगड येथील तहसील कार्यालयासमोर हुतात्मा स्मारक पाशी सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाला प्रत्यक्ष उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला व तसे निवेदन ही दिले आणि मराठा समाजाच्या सोबत ब्राह्मण समाज नेहमी असेल याची ग्वाही दिली. भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने श्री सम्राट मोरे, श्री प्रकाश पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
यापूर्वीही ज्यावेळी मराठा समाजाचे पूर्ण महाराष्ट्रात मोर्चे निघत होते त्यावेळीही भुदरगड तालुका ब्राह्मण जागृती संघटनेच्या वतीने जिल्ह्यात पहिल्यांदा प्रत्यक्ष उपस्थित राहून पत्र देऊन जाहीर पाठिंबा दिलेला होता.
श्री गणेश मुंगळे वकील यांनी ब्राह्मण समाजाच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्री गणेश मुंगळे वकील, श्री प्रशांत पुजारी, श्री मिलिंद ताम्हणकर, श्री घनशाम ठाकूर वकील, श्री दिगंबर पोतदार, श्री नंदकुमार सातोस्कर, श्री बाळ कुलकर्णी, श्री भूषण शुक्ल, श्री गिरीश कामत, श्री कुलदीप कामत, श्री सुनील शुक्ल,श्री मुकुंद कुलकर्णी, श्री प्रकाश कुलकर्णी, श्री प्रथमेश कुलकर्णी, श्री उमेश कुलकर्णी, श्री प्रकाश बापट, श्री रमेश पंढरपूरे आदी ब्राह्मण बांधव उपस्थित होते.