ॲड सुरेश नरसगोंडा पाटील (दत्तवाडकर) यांची पंचायत राज व ग्रामविकास विभाग जिल्हा सहसंयोजक पदी निवड
दत्तवाड येथील. ॲड सुरेश नरसगोंडा पाटील (दत्तवाडकर) यांची पंचायत राज व ग्रामविकास विभाग जिल्हा सहसंयोजक पदी निवड करण्यात आली निवडीचे पत्र जिल्हा संयोजक दिलीप राजाराम पाटील व डॉ .संजय पाटील यांनी नुकतेच दिले.
पाटील यांनी यापूर्वी प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना अध्यक्षपद आत्मनिर्भय भारत जिल्हा सहसंयोजक याबरोबरच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे दत्तवाड येथील अध्यक्ष आहेत त्यांनी करत असलेल्या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेश यांच्याकडून त्यांची जिल्हा सहसंयोजक पदी निवड करण्यात आली असे दिलेल्या पत्रात म्हटले आहे याबरोबरच त्यांचा असलेला व्यासंग काम करण्याचा विविध पदावर काम करण्याचा अनुभव लक्षात घेऊन प्रशासन व जनता यांच्यात दुवा बनून पंचायत राज व ग्रामविकास विभागात सर्वसामान्य लोकांच्या कामाचा निपटारा लवकर व्हावा यासाठी ग्रामीण व शहरी विभागासाठी त्यांची निवड करण्यात आली असल्याचे पत्रात म्हटले आहे.
या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.