दत्तवाड येथे ट्रॅक्टरचे हेडलाईट फोडले स्वाभिमानी कार्यकर्ते आक्रमक
दत्तवाड -येथे ऊस तोडीसाठी आलेल्या बैलगाड्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परत पाठवल्याने कारखाना समर्थक व संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली तर सदलगा वेश येथे ऊस भरण्यासाठी आलेला ट्रॅक्टर चे हेडलाईट फोडून टायर मधली कार्यकर्त्यांनी हवा सोडली.
येथील ऊस तोडण्यासाठी पहाटे बैलगाड्या येणार असल्याची माहिती स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी दवाखाना चौक येथे पहाटेपासूनच गर्दी केली तेथे आलेल्या कारखान्याच्या दहा बैलगाड्या कार्यकर्त्यांनी परत पाठवल्या मात्र यावेळी कारखाना समर्थक जमा झाल्याने त्यांच्यात व स्वाभिमानी कार्यकर्त्यात दोन तास वादावादी झाली यावेळी कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालून त्यांना परत पाठवले. मात्र याच वेळी सदलगा वेश येथे ऊस भरण्यासाठी ट्रॅक्टर आल्याचे स्वाभिमानी कार्यकर्त्यांना करतात त्यांनी तिकडे धाव घेऊन ट्रॅक्टरचे हेडलाईट फोडून मुख्य चाकातील हवा सोडून दिली यामुळे ट्रॅक्टरचे साठ हजार रुपये नुकसान झाले याबाबत ट्रॅक्टर चालकाने कुरुंदवाड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.
दिवसभर स्वाभिमानी कार्यकर्ते व कारखानदार समर्थक यांच्यात वादावादी होत राहिली एका ठिकाणी तोडलेला ऊस संध्याकाळपर्यंत शेतातच होता व स्वाभिमानी कार्यकर्ते तो ऊस रस्त्यावर येण्याची वाट पाहत थांबले होते. यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.