टाकळवाडी शेतकऱ्यांचा ऐतिहासिक निर्णय कारखान्यांना ऊस देणार
दत्तवाड -- . गावातील सर्वच ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याला ऊस देणार असा ऐतिहासिक निर्णय गावातील सर्वच शेतकऱ्यांनी एकमताने घेतला आहे अशा निर्णय घेणारे जिल्ह्यातील टाकळीवाडी ता शिरोळ हे पहिले गाव ठरले आहे.
या हंगामात पाऊस कमी झाला आहे यामुळे नदीसह विहिरी बोअरवेल ला पाणी कमी आहे. त्यामुळे उत्पादन कमी झाले आहे यातच यावर्षी ऊस दरावरून आंदोलन सुरू आहे मात्र इथून पुढे आंदोलन लांबत गेल्यास आमचे पाण्यामुळे उत्पादन कमी होऊन आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे आत्ता दिलेला उसाचा दर आम्हाला मान्य आहे त्यामुळे आम्ही कारखान्याला ऊस देण्यास तयार आहोत असा ठराव टाकळीवाडी ता. शिरोळ येथील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत चौकात झालेल्या सभेत एकमताने केला. ऊस उत्पादक शेतकरी मिळून आमचा ऊस ,"ना आंदोलन ना संघर्ष" न करता आम्ही आमचा ऊस कारखान्याला तोडून देणार असे सर्व शेतकरी मिळून एकमताने निर्णय घेतला आहे. यावेळी संघर्ष झाल्यास संघर्ष करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस यंत्रणाकडे तक्रार करणार गावातील सर्व शेतकरी ऊस कारखान्यात पोहोच करणार सर्वच कारखानदारांनी आम्हास सहकार्य करून उद्यापासून ऊसतोड द्यावी अशी विनंती केली आहे.
यावेळी तुकाराम चिगरे, खुशाल कांबळे, बाबासाहेब वनकोरे,पी.मो.जमादार, चंद्रकांत निर्मळे, बाजीराव गोरे, धनपाल भमाणे,बजरंग गोरे,वसंत गोरे,भरत पाटील,वासूदेव खोत, तसेच टाकळीवाडीतील सर्व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.