Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

ऊसतोड मजुरांना जिवनावश्यक सुविधेबरोबर आरोग्य, पिण्याचे पाणी, अन्नधान्य व शैक्षणिक सुविधा पुरविणे.- अन्यथा आंदोलन

     


                        

 कुरुंदवाड : ( प्रतिनिधी ) : ऊसतोड मजुरांना जिवनावश्यक सुविधेबरोबर आरोग्य, पिण्याचे पाणी, अन्नधान्य व शैक्षणिक सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून वस्तीच्या ठिकाणी साखर शाळा सुरू कराव्यात अन्यथा वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा विंचीत बहुजन आघाडीचे शिरोळ तालुका उपाध्यक्ष उदय कांबळे व तालुका महासचिव रमेश कांबळे यांनी एका निवेदनाद्वारे प्रसिध्दीस दिले आहे.

           साखर कारखान्याच्या ऊसतोडीसाठी राज्याच्या विविध भागातून सांगली, सोलापुर, सातारा, बीड, उस्मानाबाद (धाराशिव), नांदेड, लातुर व शेजारील कर्नाटक राज्यातील विजापूर व बेळगावी या भागातून ऊसतोडीसाठी मजुर मोठया प्रमाणात आलेले आहेत. यावर्षीचा साखर हंगाम चालु होत आहे व काही ठिकाणी चालू झालेला आहे. या सर्व मजूरांना आप-आपल्या कारखाना कार्यस्थळावर मुक्कामास ठेवण्यात आलेले आहे. यांचेसाठी मोठया प्रमाणात झोपडया उभ्या केलेल्या आहेत.

       मात्र त्यांच्या सोबत आलेल्या कुटुंबीय सह मुलांसाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.ते कुठेही दिसून येत नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधाही पुरवली गेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कामगारांचे राहत्या ठिकाण व पिण्याचे पाण्यात बदल होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.



     मुलांच्या शिक्षणाची खुप मोठी आभाळ होत आहे. त्या ठिकाणी साखर शाळा सुरु करुन त्यांच्या शिक्षणाची होणारी हेळसांड थांबवावी. या सर्व मजुरांना आपल्या कुटुंबासह कारखाना कार्यक्षेत्र ऊसाच्या शिवाराच्या ठिकाणी झोपडया मांडून मुक्कामास राहीले आहेत. कारखाना कार्यस्थळावर या ऊसतोड कुटुंबासोबत या मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणेत यावी व जे मजुर ऊसाच्या शिवारात राहीले आहेत अशा मजुरांच्या मुलांना शिक्षणापासुन वंचित न ठेवता कारखाना कार्यस्तळावर साखरशाळेचे नियोजन करून त्या मुलानां नेण्याची-आणण्याची जबाबदारी कारखान्याने करावी.

      सध्या उसाची दर जाहीर न झाल्याने आंदोलन चालु आहेत.त्यामुळे कारखाने बंद आहेत ऊसतोड मजुरांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे शासनाने आणि कारखानदारांनी त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करावी.अन्यथा वंचीत बहुजन आघाडीला या सर्व मजुरांच्या साठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल याची नोंद घ्यावी  असा इशाराही दिला आहे. या निवेदन वर शिरोळ तालुका उपाध्यक्ष अनिल कांबळे, कुरुंदवाड शहर उपाध्यक्ष अमोल मधाळे, जिल्हा संघटक महावीर कांबळे यांच्या सह्या आहेत.