Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

उसात पाणी सोडा आणि कारखानदारांची जिरवा- धनाजी चुडमुंगे



टाकळी -साखरेसह बग्यास व मळीला गेल्या वर्षात उच्य पातळीचा दर मिळाला आहे. कारखाने मोठया फायद्यात चालले असताना शेतकऱ्यांना मात्र तुम्ही उसाचा कमीत कमी दर ( एफ आर पी ) देऊन गप्प बसा म्हणत असाल तर ते चालणार नाही

कारखान्यांना झालेल्या फायद्यातील वाटा हा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे ज्या प्रकारे उसापासून तयार होणाऱ्या पदार्थांना उच्य दर मिळाला आहे त्याच प्रकारे शेतकऱ्यांना पण उसाला उच्य दर आम्ही मागत आहोत तो मिळाल्याशिवाय कोणीही ऊस देऊ नका ज्यांना अडचण आहे त्यांनी उसात पाणी सोडून आंदोलनाला साथ द्या असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी केले. ते काल टाकळी येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.सभेच्या अध्यक्षस्थानी तुकाराम पाटील तात्या पाटील होते.

ऊस दर आंदोलनाच्या पार्शवभूमीवर व शिरोळात 9 नोव्हेंबर ला आंदोलन अंकुश च्या होत असलेल्या एल्गार सभेच्या जागृती साठी काल मारुती मंदिर येथे झालेल्या सभेत ते पुढे म्हणाले की यावर्षी शेतकऱ्यांनी दाखवलेली एकजूट ही अभूतपूर्व अशी आहे कोणीही कारखान्यांना ऊस द्यायला तयार नाही कर्नाटक मधून ऊस आणून कारखाना चालू झाला हे दाखवण्यासाठी कारखानदार गुंड पुंड आणि पैलवान आणून दादागिरीने ऊस नेण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांची ही मस्ती टाकळीकरानी एकजुटीने उतरवण्यासाठी रस्त्यावर यावे असेही आवाहन त्यांनी केले.

स्वागत व प्रास्ताविक अरुण पाटील यांनी केले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष उदय होगले व तालुका अध्यक्ष दीपक पाटील व हलिंगळे सर यांची जोरदार भाषणे झाली आभार राजू पाटील यांनी मानले यावेळी अरुण पाटील सावकर विलास काटकर विजय पाटील आत्मराम पाटील रामचंद्र पाटील आप्पा सचिन वाणी रोहन पाटील विलास पाटील अमोल शिरटी विनायक पाटील काकासो पाटील संतोष मिरजे बंडू पाटील हे उपस्थित होते.



कमी पाऊस झाल्याने उसाची वाढ झालेली नसल्याने यावर्षी एकरी उसाचे उत्पादन घटणार आहे त्यामुळे कमी उत्पादनाच्या या काळात उसाला जास्त दर घेऊन होणारं नुकसान टाळता येईल या उद्देशाने आम्ही यावर्षी तुटणाऱ्या उसाला 3500 पहिली उचल मागत आहोत हा दर मिळायचा झाल्यास जोपर्यंत कारखाने 3500 देतो असे जाहीर  करत नाहीत तोपर्यंत उसाला हात लावून देऊ नका असे त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केले.


यावर्षी साखर उत्पादन घटणार असल्यामुळे देशाच्या इतिहासातील साखरेला सर्वात उच्यांकी दर यावर्षी मिळत आहे.पुढील वर्षभर या दरात अजून वाढ होणार आहे.

साखर दरावर उसाचा दर अवलंबून असतो असं आपले कारखानदार नेहमी म्हणत आलेले आहेत मग साखरेला उच्यांकी दर मिळत असेल तर शेतकऱ्यांना पण उसाचा उच्यांकी दर का देत नाही असा सवाल धनाजी चुडमुंगे यांनी कारखानदारांना यावेळी केला.