रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या नेशन बिल्डर आणि व्होकेशनल अवॉर्डचे उद्या वितरण गुणवंत शिक्षक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान
शिरोळ : प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीच्या वतीने देण्यात येणाऱ्या नेशन बिल्डर व व्होकेशनल अवॉर्ड आणि विशेष सेवा गौरव पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता कलेश्वर मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात होणार असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष संजय तुकाराम शिंदे सचिव तुकाराम पाटील ट्रेझरर संजय रामचंद्र शिंदे आणि इव्हेंट चेअरमन चंद्रकांत भाट यांनी दिली
आपल्या कर्तुत्वाने कर्तव्याबरोबरच सामाजिक भान जपणाऱ्या मान्यवर व्यक्तींना व्होकेशनल अँवार्ड आणि शिक्षकी पेशात राहून आपले वेगळेपण जपणाऱ्या व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या मान्यवर शिक्षकांना नेशन बिल्डर अँवार्ड आणि आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विशेष सेवा गौरव पुरस्कार देऊन रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीच्या वतीने प्रत्येक वर्षी गौरवण्यात येते यावर्षी श्री रेणुका भक्त मंडळाचे अध्यक्ष दिलीपराव माने चिरमुरे विक्री व्यवसायाबरोबर शेती करणारे बाळासो भाट कापड आणि बांगड्याचा व्यवसाय करणाऱ्या महिला सौ लैलाबी मज्जिद आत्तार यांना व्होकेशनल अँवार्ड आणि गुणवंत शिक्षक सौ संगीता घोरपडे इंदुमती माने नलिनी काळे पृथ्वीचंद माछरेकर वजीर गवंडी यांना नेशन बिल्डर अँवार्ड तर गणपती कोळी यांना विशेष सेवा गौरव व संजय देबाजे यांना क्रीडा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे
शनिवारी सायंकाळी ४ वाजता कल्लेश्वर मंदिरातील सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे उद्योगपती विनोद घोडावत यांच्या हस्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे तरी या सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे
यावेळी रोटरी क्लब हेरिटेज सिटीचे सदस्य संजय पाटील प्रा काशिनाथ भोसले डॉ अरविंद माने उमेश कळेकर अतुल पाटील अजित बिरनाळे आप्पालाल चिकोडे संजीव पुजारी राहुल यादव गजानन पाटील विराजसिंह यादव शरद उर्फ बापू मोरे अनिकेत जोशी श्रीकांत जाधव उल्हास पाटील विवेक फल्ले महेश माने सचिन सावंत भरत गावडे परशुराम चव्हाण संदीप कांबळे रणजीत जगदाळे सुभाष भंडारे अमोल चव्हाण सुचित माने राहुल माने शिवाजी कोळी यांच्यासह सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते