कै. रावसो कृ. अंबुपे दुध संस्थेच्या वतीने दूध उत्पादकांना बोनस वाटप
दत्तवाड- नवे दानवाड ता.शिरोळ येथील कै. रावसो कृष्णा अंबुपे दुध संस्थेच्या वतीने दूध उत्पादक सभासदांना दूध फरक बिलाचे वाटप करण्यात आले. म्हैस दूध प्रती लिटर ५.२५ रू व गाय दूध प्रती लिटर ३.७५ रू प्रमाणे असे एकूण रक्कम २० लाख २५ हजार ६८० रूपये व दिवाळी निमित्ताने सर्व दूध उत्पादक सभासदांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आले.
म्हैस विभागात चेतन मोकाशी- ४७०११रू.सुनील अंबुपे- २५०९२रू. महादेव अंबुपे- २४२५७रू.
गाय विभागात अनील बेरड-७१५९३रू.विठ्ठल परिट-३१२५१रू. प्रकाश अंबुपे-२९७१३रू.यांनी क्रमांक मिळवले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एल. किट्टे यांनी उपस्थित सर्व दूध उत्पादक सभासदांना दुग्ध व्यवसाय व जनावरांना होणारे आजार - घरगुती पद्धतीने करावयाचे उपचार या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमावेळी.... माजी सुपरवायझर मोहिते , चेअरमन सचिन अंबुपे , अनील अंबुपे, विद्याधर तिप्पाण्णावर, सुरेश अंबुपे, शिवू पाटील, बंडू पाटील, मुत्ताप्पा धनगर, अविनाश सुतार, भरमगोंडा पाटील, अल्लाउद्दीन देसाई, बाळू अंबुपे, शैलेद्रसिंग रजपूत, दूध प्लांट चे सर्व कर्मचारी व दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.