*श्री नसिंह सरस्वती महिला दूध संस्थेची उच्चाकी फरक बिलाची परंपरा कायम* -बबनराव चौगुले*
दत्तवाड -- उच्चांकी फरक बिल देण्याची परंपरा श्री नसिंह सरस्वती महिला दूध संस्थेने यावर्षीही कायम राखली असून सभासदांचे हित जोपासण्यासाठी संस्थेचे सर्वच पदाधिकारी कायम प्रयत्न करतात याबरोबरच नवनवीन प्रयोग करून दूर उत्पादक सभासदांना जास्त फायदा देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो असे उद्गगार गुरुदत्त शुगरचे संचालक व या संस्थेचे संस्थापक बबनराव चौगुले यांनी काढले ते दूध फरक बिल व दिवाळी भेटवस्तू वाटप कार्यक्रमात बोलत होते.
संस्थेकडून म्हैस दूध उत्पादकाला प्रति लिटर सहा रुपये पंचवीस पैसे तर गाय दूध उत्पादकाला प्रति लिटर चार रुपये असे मिळून सहा लाख तेहतीस हजार नऊशे रुपये दूध उत्पादक सभासदांच्या खात्यावर आज जमा करण्यात आले. याबरोबरच दिवाळी भेटवस्तूचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संस्था सतत अ वर्ग ऑडिट प्राप्त आहे संस्थेमार्फत एखाद्या दूध उत्पादक सभासदाचे जनावर दगावले तर त्याला तात्काळ पाच हजार रुपयाची मदत केली जाते.अशी मदत करणारी परिसरातील एकमेव संस्था आहे.
यावेळी चेअरमन मीनाक्षी चौगुले व्हाईस चेअरमन मनीषा जोशी सचिव आदिनाथ चौगुले अण्णासाहेब नागराळे शब्बीर दफेदार यांच्यासह दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थिती होते.