घोसरवाड येथे शासकीय लाभचे शिबिर
दत्तवाड - घोसरवाड ता. शिरोळ येथील जिल्हा परिषद आरोग्य केंद्र मार्फत नागरिकांना विविध शासकीय लाभ मिळण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अशा सेविका या घरोघरी जाऊन नागरिकांना विविध शासकीय लाभ मिळण्यासाठी आयुष्यमान भारत व गोल्डन कार्ड या आरोग्य विषयी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देऊन केंद्रामार्फत दवाखान्यात शिबिराचे आयोजन करत आहेत .शासकीय लाभ मिळण्यासाठी उपयोग असणारे कार्ड्स उपलब्ध करून देत आहेत पाच लाख रुपयापर्यंत मोफत आरोग्य उपचार करणाऱ्या या माहितीचा व गोल्डन कार्डचा उपयोग गावातील पाच हजार नागरिकांना होणार आहे.
यावेळी डॉ.भूषण यमाटे, आरोग्य सेवक विष्णू पोतदार, मेरी कानिटकर, आयेशा मुल्ला, श फरनाज सनदी, प्रियंका लोकरे बाबासाहेब निर्मळे व सर्व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.