माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार
दत्तवाड--येथील ग्रामीण रुग्णालय इमारत व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी नागपूर येथे झालेले अधिवेशनात १६ कोटी ४८ लाख रुपये मंजूर केल्याबद्दल माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला.
एकूण 30 खाटाचे रुग्णालय बांधकाम होणार असून या ग्रामीण रुग्णालयामुळे दत्तवाड सह खिद्रापूर राजापूर राजापूर वाडी टाकळी टाकळीवाडी नवेदनवाड जुने दानवाड घोसरवाड या गावातील नागरिकांना लाभ होणार आहे. या भागातील गर्भवती महिला, आजारी रुग्ण, सीमा भागातील रुग्णाबरोबरच महापूर ग्रस्त परिसर असल्याने महापूर काळात या रुग्णालयाचा उपयोग होणार आहे .
ग्रामीण रुग्णालयासाठी १६ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) साहेब यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दत्तवाड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नाना नेजे,यड्राव बँकेचे संचालक धन्यकुमार सिदनाळे,गुरुदत्त साखर कारखान्याचे संचालक बबन चौगुले,माजी सरपंच बी.वाय.शिंदे,प्रकाश चौगुले आदि मान्यवर उपस्थित होते .