Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

*बँक कर्मचारी हल्ला निषेध धरणे कार्यक्रमात व्यापक सहभाग* सोमवारी प्रांतांना शिष्टमंडळ भेटणार



 *बँक कर्मचारी हल्ला निषेध धरणे कार्यक्रमात व्यापक सहभाग* 

सोमवारी प्रांतांना शिष्टमंडळ भेटणार

आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँक, गोपीनाथ पाटील पारसिक बँक,अक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक इ. बँकांच्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेध कार्यक्रमात विविध विभागांचे ५०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले. हा प्रश्न सर्व बँकांच्या कर्मचाऱ्यांना तसेच पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांना भेडसावणारा प्रश्न आहे. त्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन काम करावे असा सर्वानुमते विचार झाला असून आता झालेल्या जागृतीच्या सहाय्याने हा प्रश्न धसास लावण्याचा मनोदय अनेकांनी व्यक्त केला.

बँक एम्प्लॉइज युनियन कोल्हापूर ने निमंत्रित केल्या वरून आज शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील पतसंस्था  कर्मचारी संघटना, वसुली अधिकारी संघटना, तसेच अनेक बँकांचे संचालक, जनरल मॅनेजर,राष्ट्रीयकृत बँका,सहकारी बँक कर्मचारी, खाजगी बँका व वित्त संस्थांचे वसुली एजंट इत्यादी उपस्थित होते. 

प्रथम महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. सुनील बारवाडे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष अतुल दिघे यांनी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. *कर्ज बुडव्या पासून बँका पतसंस्था वाचवा गरिबाला सावकारी पासून वाचवा* या भूमिकेने आपल्याला पुढे चालावे लागेल असे त्यानी मांडले. यानंतर बादशहा बागवान(चेअरमन अमन बँक)प्रफुल्ल यादव, सुधाकर पिसे,रामचंद्र कदम, दिपक पेटकर, प्रकाश जाधव, बजरंग दानोळे,सुर्यकांत जाधव, सागर पाटील,प्रताप पोवार, संजय बोडके, रमेशकुमार मिठारे,दिपक पाटील,संतोष पांचाळ,सुनिल भांडवले,दिलीप लोखंडे,मनोहर जोशी,नारायण मिरजकर इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले.अनिल रेंदाळे,विजय तारळेकर,राजू शेलार, बाळासाहेब भिसे,विविध संस्था पदाधिकारी, कर्मचारी सर्वांची उपस्थिती लक्षणीय होती. 

सोमवारी सकाळी 11.00 वाजता धरणे कार्यक्रमाचे निवेदन घेऊन प्रांतांना भेटावे असे सर्वानुमते ठरले. कर्जबुडव्यांच्या गुंडगिरी च्या विरोधात सर्व संबंधित संस्था संघटना यांनी प्रांतांना भेटण्यासाठी यावे असे आवाहन करण्यात आले आहे.