Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

शिरोळ तालुक्यातील सर्व केंद्रात शिक्षण परिषद संपन्न.

 


शिरोळ तालुक्यातील सर्व केंद्रात शिक्षण परिषद संपन्न.

शिरोळ:पंचायत समिती शिरोळ शिक्षण विभाग अंतर्गत सर्व१२ केंद्रे,जयसिंगपूर नगरपालिका शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिरोळ येथील प्रशिक्षण केंद्रावरील प्रशिक्षणार्थी यांची शिक्षण परिषद तालुक्यातील विविध ठिकाणी संपन्न झाली.

             मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमासंदर्भातील विशेष कार्यशाळा हा शिक्षण परिषदेचा मुख्य विषय होता.जिल्हा परिषद कोल्हापूर येथून संचलित असणारी दूरसंवादभाष्य माध्यमातून जिल्हयातील सर्वच केंद्रामध्ये ही शिक्षण परिषद आयोजित केली होती.मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी अभियानांसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी होणार नाही.त्यामुळे निश्चितपणे या अभियानांत सर्वांनी मनापासून सहभागी होवून स्पर्धेत उतरले पाहिजे.१५ व्या वित्त आयोगातून खर्च होणाऱ्या निधीसाठी ग्रामपंचायतीकडे मागणी नोंदविण्याची आवश्यकता आहे.यासाठी मुख्याध्यापक, गटशिक्षण अधिकारी यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.       

           शिक्षण परिषदेत अनेक शिक्षकांनी या संदर्भातील शंका,प्रश्न विचारणा केली.त्याचे निरसन जिल्हास्तरावरून शिक्षणाधिकारी मीना शेंडकर व उपशिक्षणाधिकारी उदय सरनाईक,एस.के.यादव यांनी केले.प्रारंभी पोर्टलवरील माहिती भरण्यास सुरुवात केलेल्या व न केलेल्या शाळांचा आढावा घेवून काम करण्याचे आवाहन केले.

           गट शिक्षण अधिकारी भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत,अनिल ओमासे,नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व केंद्रीयप्रमुखांनी नेटके नियोजन केले होते.तांत्रिक साहाय्य तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षकांचे सहकार्य लाभले.