आदित्य ठाकरे यांच्या हुपरीतील सभेने शिवसेनेला गतवैभव प्राप्त होणार
कुरूदवाड --युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हुपरी येथील सभेसाठी शिरोळ व हातकलंगडे तालुक्यातील हजारो शिवसैनिक जाणार असल्याची माहिती नूतन जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी दिली.
बुधवार 10 जानेवारी रोजी हुपरी तालुका हातकलंगडे येथील यशवंत मंगल कार्यालय येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना चे युवा नेते आदित्य ठाकरे यांची महानिष्ठ मेळावा सभा होत आहे. या मेळावा सभेची तयारी पूर्ण झाली असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा महत्त्वाची आहे. युवा नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात सभा घेऊन भाजपच्या नाकर्त्या राज्यकर्त्यांवर चौफेर टीका करून त्यांना उघडे पाडले आहे. त्यामुळे या सभेला सर्व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आव्हानही त्यांनी केले.