शिरोळ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेला उदगावमध्ये सुरुवात.
शिरोळ :जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभाग, पंचायत समिती शिरोळ च्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे शुभहस्ते झाले.
स्वागत व प्रास्ताविक गट शिक्षण अधिकारी भारती कोळी यांनी केले.त्या पुढे म्हणाल्या, यशाने हुरळून जावू नका तसेच अपयशाने खचून न जाता खिलाडूवृतीने स्पर्धेत भाग घेतला पाहिजे.मुलांच्या बौद्धीक विकासाबरोबरच शारिरीक व मानसिक विकासासाठी खेळ महत्वाचे आहेत.या दृष्टीकोनातूनच जिल्हा परिषद कोल्हापूर व शिरोळ पंचायत समिती शिक्षण विभाग यांचे विद्यमाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे नियोजन केले आहे. चिपरी केंद्राने चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे.स्पर्धेसाठी सहकार्य केलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देते.
याप्रसंगी गट विकास अधिकारी शंकर कवितके, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदिप पाटील,गट शिक्षण अधिकारी भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक कामत,अनिल ओमासे,क्रीडा विभागप्रमुख नारायण पाटील,सरपंच -मेघराज वरेकर,अरूण कोळी,सलीम पेंढारी,दिलीप कांबळे,यशवंत माने,बाळासाहेब कोळी,अनुराधा कांबळे,हणमंत रजपूत,संदिप दबडे,संदिप पुजारी,शंकर जंगम, केंद्रीय प्रमुख -रियाजअहमद चौगले,अण्णा मुंडे,दत्तात्रय जाधवर,सलिम अत्तार,यशवंत पेठे, संदिप कांबळे,रविकुमार पाटील,सुनिल एडके,विजय भोसले,शिवाजी ठोंबरे,संतोष जुगळे,राजाराम सुतार,मनोज रणदिवे,प्रकाश खोतसुरेश पाटील,दिलीप पाटील, मुख्याध्यापक शंकर जंगम,पत्रकार अरुण चौगुले, दिलीप शिरढोणे,स्कूल कमिटीचे चेअरमन व सदस्य,शिक्षक संघटना प्रतिनिधी,शिक्षक बँक व पतसंस्थाचे चेअरमन,संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.सूत्रसंचलन - किरण पाटील व महेश घोटणे यांनी केले. स्पर्धेचे संयोजन चिपरी केंद्र करीत आहे.