कुरुंदवाड येथील साधना मंडळामार्फत कबड्डी व कुस्ती स्पर्धेचे आयोजन
कुरूदवाड -
येथील साधना मंडळामार्फत अडीच लाख रुपये रोख बक्षिसाच्या विद्युत झोतातील कबड्डी व कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १२ जानेवारी ते १५ जानेवारी अखेर नगरपालिकेच्या तबक उद्यानात कै. सदाशिव गणपती लोकरे इचलकरंजी क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धा विविध गटामध्ये भरण्यात येणार आहेत.
खुल्या गट कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील २० पेक्षा जास्त संघ सहभागी होणार आहे या विभागात प्रथम क्रमांक ४१ हजार द्वितीय क्रमांक ३२ हजार तृतीय क्रमांक २१ हजार व कायमस्वरूपी चषक वैयक्तिक पारितोषिक. मध्ये खुला गटासाठी मॅन ऑफ द डे, मॅन ऑफ द मॅच, व उत्कृष्ट खेळाडू अशी वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत तर ५५ किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक पंधरा हजार द्वितीय क्रमांक ११,००० हजार तृतीय क्रमांक सात हजार रोख बक्षिसे व कायमस्वरूपी चषक प्रदान करण्यात येणार आहे. तर वैयक्तिक पारितोषिकांमध्ये मॅन ऑफ द मॅच व उत्कृष्ट खेळाडू देण्यात येणार आहेत
शिरोळ तालुका मर्यादित कुस्ती स्पर्धा १२ जानेवारी रोजी होणार असून यात बारा गटात विविध वजनी गटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून कुस्ती गटातील विजेत्यांना ७ ००० रुपये रोखीचे बक्षीस वाटप करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक १२ जानेवारी रोजी सायंकाळी होणार असून रविवारी दिनांक १५ जानेवारी रोजी बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
यावेळी पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पत्रकार बाबासो मोरे, सुरेश कांबळे ,संतोष तारळे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष स ग सुभेदार यांनी केले. यावेळी जयपाल बलवान, अब्बास पाथरवट, कुतुबदिन दानवाडे, महावीर पोमाजे, वैभव उगळे, महावीर कडाळे, महादेव कुंभार जयपाल आलासे सुभाष मगदूम दामोदर मगदूम दीपक परीट बापूसो दळवी नामदेव कमलाकर अमोल बंडगर श्रीकांत चव्हाण सुरेश देसाई राजू प्रधान दीपक पाटील मिरासो पाथरवट संतोष जुगळे महेश घोटणे , गणेश तावदारे, महादेव नाईक, सरफराज जमादार ,रमेश कुंभार ,अरुण डांगे, वीरगोडा बंडगर, अर्जुन पाटील ,संजय खोत, सुरज जाधव, डॉ. राजेश पटेकरी, नाना फल्ले ,आप्पा बंडगर यांच्यासह स्पर्धा विभाग प्रमुख उपस्थित होते.