Home
/
Unlabelled
/
दत्तवाड येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा विविध मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
दत्तवाड येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा विविध मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
दत्तवाड येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा
विविध मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
दत्तवाड ता. शिरोळ येथील ग्रामीण रुग्णालय येथे प्रतिवर्षा प्रमाणे दत्तवाड परिसर. पत्रकार सघा मार्फत पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गुरूदत्त कारखान्याचे संचालक बबनराव चौगुले, डॉ.इरफान नदाफ, डॉ. हर्षवर्धन गायकवाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर व दत्तवाड गावचे पहिले पत्रकार कै. डी ए शेख यांच्या प्रतिमेचे पूजन गुरुदत्त शुगरचे जन संपर्क अधिकारी विकास चौगुले, डेपोटी एच आर मॅनेंजर सी. डी. पाटील आणि विजय पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी बबनराव चौगुले, विकास चौगुले, दिलीप शिरढोणे, युवराज घोरपडे ,डॉ. हर्षवर्धन गायकवाड, राजगोंडा पाटील, सुरेश पाटील,यांनी मनोगते व्यक्त करून सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या .
ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना मान्यवरांच्या हस्ते फळे व बिस्किटे वाटप करण्यात आले.व आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.व पत्रकाराची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धन्यकुमार सिदनाळे, एन एस पाटील, उपसरपंच अकबर काले, भाजप तालुका उपाध्यक्ष राजगोंडा पाटील, मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे, शिवसेना तालुका अध्यक्ष युवराज घोरपडे, सुरेश पाटील बाळगोन्नावर, माझी तंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेब कोकणे, ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील, रफिक मुल्ला, प्रमोद पाटील, अमित माने , पत्रकार मिलिंद देशपांडे, मुन्नाभाई नदाफ, संजय सुतार,मुस्ताक अपराध, जहांगीर रणमल्ली , इसाक नदाफ, युवराज पाटील ,फिरोज कुरणे, प्रल्हाद साकुखे ,सुरेश बाडगे आदी मान्यवरांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दत्तवाड येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा विविध मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
Reviewed by JD NEWS
on
January 06, 2024
Rating: 5
Reviewed by JD NEWS
on
January 06, 2024
Rating: 5




