Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

नेजे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात



 दत्तवाड -- येथील श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल व जुनिअर कॉलेज, प्राथमिक शाळा यांचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.

       दोन दिवस चाललेल्या या स्नेहसंमेलनात पारितोषिक वितरण, विविध गुणदर्शन, चित्रकला, हस्तकला, रांगोळी प्रदर्शन असे विविध कार्यक्रम झाले.


       गुरुवारी प्राथमिक शाळेच्या स्नेहसंमेलनाची सुरुवात हस्तकला व रांगोळी प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली याचे उद्घाटन   ग्रामसेविका सारिका मोटे यांच्या हस्ते करण्यात आले तर पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे   उदय शिरोळकर होते. यावेळी उदय शिरोळकर यांनी  गाणी, कविता व लेक जन्मली या एकपात्री नाट्यप्रयोगातून प्रबोधन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राथमिकचे चेअरमन अजित चौगुले होते माध्यमिकचे मुख्याध्यापक संजय  तावदारे यांनी मनोगत व्यक्त केले तर प्राथमिकचे मुख्याध्यापक अभिजीत मालगावे यांनी स्वागत प्रास्ताविक केले पाहुण्यांचा परिचय एम एम देशपांडे यांनी करून दिला तर आभार एस ए हेरवाडे यांनी मांनले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी पी वठारे यांनी केले . पारितोषिक वितरणाचे वाचन एस डी शिंदे यांनी केले.
 यावेळी रमेश धुपदाळे , बाबासो हिमगिरे, विजय नेजे, अमोल गोरवाडे, अभिजीत मलिकवाडे प्रमुख उपस्थित होते
  दुपारच्या सत्रात प्राथमिक विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा कार्यक्रम पार पडला याचे उद्घाटन माध्यमिक चे मुख्याध्यापक संजय तावदरे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी लहान गटापासून चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे दर्शन घडवले.


     तर शुक्रवारी सकाळच्या सत्रात माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे चित्रकला, मेहंदी ,रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. हर्षद  व्हसकल्ले यांच्या हस्ते करण्यात आले तर पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेंद्र प्रधान होते.  प्रधान यांनी एकपात्री प्रयोगातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. पाहुण्यांचा परिचय आर. व्ही .पाटील यांनी करून दिला. यावेळी माध्यमिकचे चेअरमन नेमिनाथ नेजे, प्राथमिकचे चेअरमन अजित चौगुले, सुकुमार सिदनाळे, आर बी सूर्यवंशी, आर आर मगदूम, प्रभू चौगुले, रमेश धुपदाळे, पर्यवेक्षक डी बी रायनाडे,  प्राथमिकचे मुख्याध्यापक अभिजीत मालगावे, कार्याध्यक्ष एम बी नायकवडे, खजिनदार डी बी खुरपे, जूनियर विभाग प्रमुख आर बी भिलवडे, उपस्थित होते.


      दुपारच्या सत्रात माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. याचे उद्घाटन सुकुमार सिद्धनाळे यांच्या हस्ते करण्यात आले तर शेवटी आभार मुख्याध्यापक संजय तावदारे यांनी मांनले.