Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

सुरेखा खेताणी यांचे वतीने दत्तवाडच्या जिल्हा परिषदेच्या मुलांमुलींना स्कूल बॅग्ज, शालोपयोगी साहित्य व खाऊ वाटप.



 सुरेखा खेताणी यांचे वतीने दत्तवाडच्या जिल्हा परिषदेच्या मुलांमुलींना स्कूल बॅग्ज, शालोपयोगी साहित्य व खाऊ वाटप.

दत्तवाड:दत्तवाडचे सरकार श्रीमंत भवानीसिंह घोरपडे यांच्या विशेष प्रयत्नाने मुंबई येथील भगवान महावीर यांच्या शिष्या व सामाजिक कार्यकर्त्या प्राची शेठ (खेताणी) यांचे स्मरणार्थ सुरेखा महेंद्रभाई खेताणी यांच्या वतीने"मायेची ऊब"उपक्रमांतर्गत स्कूल बॅग्ज, शालोपयोगी साहित्य व खाऊ वाटप सुरेखा महेंद्रभाई खेताणी यांचे शुभहस्ते करण्यात आले. आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या शेकडो शाळांमध्ये स्कूल बॅग्ज, शालोपयोगी साहित्य व स्वेटर अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.

        कुमार विद्या मंदिर व विद्या मंदिर बांबरवाडी,दत्तवाडच्या मुलांना स्कूल बॅग्ज,शालोपयोगी साहित्य व खाऊ वाटप तसेच समाजातील गरजू व गरीब महिलांना संसारोपयोगी वस्तूंचे कीट स्वरूपात मदत करण्यात आली.

       याप्रसंगी उषा घेवडे,CFOI चे अध्यक्ष आशिष घेवडे,मितेश घेवडे,शार्दूल गरगटे,अॅड. युवराज घोरपडे,उपसरपंच अकबर काले,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदिप वडर, उपाध्यक्षा आरती कांबळे,सदस्य -नामदेव चव्हाण,शितल बंकापूरे,मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे,मुख्याध्यापिका सुनिता खटावकर,काका पुजारी,महावीर कांबळे,ज्योस्ना सुतार,सूरज माने,सौरभ जाधव,सोमनाथ जाधव,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.