Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

*घोसरवाड येथे भव्य दिव्य असा हळदीकुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम हजारो महिलांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.*



*घोसरवाड येथे भव्य दिव्य असा हळदीकुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम हजारो महिलांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.* श्रीराम ज्वेलर्स व सिद्धरेखा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घोसरवाड येथे भव्य दिव्य असा हळदीकुंकू समारंभ व होम मिनिस्टर कार्यक्रम हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये 28 जानेवारी रोजी पार पडला या कार्यक्रमाचे आयोजक सिद्धरेखा फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर सचिन शंकर चौगुले व श्रीराम ज्वेलर्सचे मालक श्री दौलत पाटील बारवाडकर हे होते या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या व सावित्रीबाई फुले यांच्या फोटो पूजनाने झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ रूपाली पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या  सुरुवातीस मंडपामध्ये  येतानाच सर्व महिलांना हळदीकुंकू व वान देण्यात येत होते.

  कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याता सौ श्वेता सचिन चौगुले सिद्धरेखा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष या होत्या. त्यांनी व्याख्यानामध्ये स्त्री सक्षम होणे व स्त्री स्वावलंबी होणे का गरजेचे आहे याबाबत महिलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्यामध्ये स्त्रियांची आर्थिक ,मानसिक व सामाजिक सक्षमता महत्त्वाचे आहे असे त्यांनी मत व्यक्त केले . दैनंदिन जीवनातील वेगवेगळी उदाहरणे देत त्यांनी एक ते एक ते दीड तास महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यामध्ये महिला अगदी निस्तब्धपणे प्रत्येक शब्द आणि शब्द ऐकत होत्या. महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी व सक्षम बनण्यासाठी सौ श्वेता चौगुले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या व्याख्यानासाठी हजारो महिला उपस्थित होत्या त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ उत्तरादेवी शिंदे वहिनीसाहेब यांनी आपले अध्यक्षीय मनोगत मधे सांगितले की हा कार्यक्रम खरोखर महिलांना प्रेरणा देणारा आहे व स्त्रियांना नक्कीच यामुळे वेगळी ऊर्जा मिळेल असे मत त्यांनी मांडले. त्यानंतर  सर्व हजारो महिलांसाठी अल्पोपहाराची सोय केली होती व अल्पोपहाराचा आस्वाद घेतल्यानंतर होम मिनिस्टर कार्यक्रमास सुरुवात झाली. होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे नियोजन करणारे अभिनेते मदन पलंगे व त्यांची आठ ते नऊ लोकांची टीम उपस्थित होती . होम मिनिस्टर कार्यक्रमाची साऊंड सिस्टिम सुद्धा अगदी नावाजल्यासारखी होती त्यामुळे होम मिनिस्टर कार्यक्रमाला आणखी रंगत आली .

होम मिनिस्टर कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित हजारो महिलांमधून चिठ्ठ्या टाकून लॉटरी पद्धतीने दहा महिलांची निवड करण्यात आली. आणि त्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे दहा प्रकारचे खेळ महिलांसाठी देण्यात आले आणि त्यामधून खेळ खेळूया पैठणीचा... पैठणीची मानकरी निवडण्यात आली . होम मिनिस्टर कार्यक्रम इतका रंगला होता की अगदी .. सिद्धेश्वर मंदिराचे  भव्य दिव्य असे पटांगण आहे ते चारी बाजूने फुल भरून गेलेले होते अगदी गर्दी पाहताना माणसांच्या डोळ्याचे पारणे फिटत होते. इतकी मोठी भव्य दिव्य अशी गर्दी  या कार्यक्रमाला लाभलेली होती होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये अधून मधून वेगवेगळ्या प्रकारच्या लॉटरी पद्धतीने चिठ्ठ्या काढून त्यामधून ही प्रश्न विचारून .. महिलांना बक्षिसे दिली जात होती. अभिनेते मदन पलंगे यांचा आवाज,  त्यांचे हावभाव, त्यांचे बोलणे हे एकूणच सर्व प्रभावदायी व प्रेरणादायी होते त्यामुळे महिला अगदी होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये गुंग झाल्या होत्या आणि त्यामधूनच शेवटी तीन क्रमांक काढण्यात आले. हे तीन क्रमांकाचे मानकरी पुढील प्रमाणे आहेत. 

प्रथम क्रमांक व मानाच्या पैठणीची मानकरी सौ  चारुशीला सागर नाईक द्वितीय क्रमांक हॉटपाॅटची मानकरी सौ सीमा संजय कमते व तृतीय क्रमांक व डिनर सेटची मानकरी सौ सविता दीपक बस्तवाडे ... प्रथम क्रमांकास मानाची पैठणी देण्यात आली पैठणी जिंकलेल्या महिलेने व तिच्या ग्रुपने स्टेजवर जाऊन जीने पैठणी जिंकली तिला उचलून घेऊन आनंद साजरा केला .

. अशाप्रकारे हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये  हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी सौ विजयमाला चौगुले, सुनंदा चौगुले ,संगीता तोडकर, सुप्रिया तोडकर ,सौ गुणवंती पाटील सौ सुमन पाटील, राणी पाटील ,अंजली चौगुले पल्लवी चौगुले ,रेखा चौगुले सुरेखा चौगुले ,सौ उत्तरादेवी शिंदे वहिनीसाहेब ,साबळे वहिनी .सौ खोत वहिनी ,सौ मिसाळ वहिनी, सौ कमते वहिनी ,सर्व ग्रामपंचायत  सदस्या ,सर्व आशा वर्कर्स ,सर्व अंगणवाडी सेविका ,मदतनीस ,सौ पूजा पवार सौ उज्वला चौगुले सौ चव्हाण वहिनी, महाजन वहिनी ,नेजे वहिनी ,मधुरा कांबळे ,सौ अनिता कांबळे, सौ अंजना डवरी असे सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित होते . त्याचसोबत सर्व पत्रकार बंधू  कार्यक्रमासाठी उपस्थित होते . कार्यक्रमासाठी गावातील सर्व ग्रामस्थांचे खूप मोठे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अगदी प्रभावीपणे व स्पष्ट शब्दांमध्ये लाट हायस्कूलचे शिक्षक श्री नेजे सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार सौ अंजली चौगुले यांनी मानले.