Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

दत्तवाड मधील सर्वरोग तपासणी व मोफत उपचार शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद.

 


दत्तवाड मधील सर्वरोग तपासणी व मोफत उपचार शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद.

दत्तवाड: येथील श्री रेणुका यात्रेनिमित्त तिरंगा ग्रुप दत्तवाड व डॉ.जे.जे.मगदूम हॉस्पिटल यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत सर्व रोग तपासणी, उपचार आरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो लोकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला.मोफत नेत्र तपासणी,रक्त तपासणी, सांधेदुखी,गुडघेदुखी,त्वचा विकार,ॲलर्जी विकार,हाडांचे विकार,अस्थमा व इतर सर्वरोग, व्याधी यांच्यावर मार्गदर्शन व उपचार करण्यात आले.

        तिरंगा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष,युवा नेते श्री.राजगोंडा पाटील यांच्या विशेष प्रयत्न आणि पुढाकारातून घेण्यात आलेल्या या शिबिरास तिरंगा ग्रुपचे सदस्यांनी चांगले नियोजन करून शिबीर यशस्वी केले.



यासाठी ग्रामपंचायत दत्तवाड, यात्रा कमिटी,जे.जे.मगदूम हॉस्पिटलच्या डॉक्टर्स,इतर स्टाफ व प्रवीण कुदळे यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी अध्यक्ष राजगोंडा पाटील,मनोज पवार,तेजस वराळे,सुनील कुंभार,कुमार पाटील,राजू टोपाई,युवराज घोरपडे, अभिनंदन पाटील,सुधाकर गळतगे,अजित वठारे,जयपाल काणे,शिवगोंडा पाटील,धुळाप्पा मलिकवाडे,संजय सुतार,महावीर धोतरे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.