नृसिंहवाडी येथे 16 जूनला महापूर परिषद - आंदोलन अंकुश
नृसिंहवाडी येथे 16 जूनला पूर परिषद - आंदोलन अंकुश
कुरूदवाड - श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये १६ जूनला आंदोलन अंकुश, आणि सांगली कृष्णा पूर नियंत्रण कृती समितीच्यावतीनं पूर परिषदेचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार बैठकीत देण्यात आलीय. यावेळी आंदोलन अंकुश चे धनाजी चिडमुंगे व जल अभ्यासक विजयकुमार दिवाण प्रमुख उपस्थिती होते. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला नेहमी भेडसावणाऱ्या महापूराला कर्नाटकातील अलमट्टी धरणासोबतच हिप्परगी धरणही जबाबदार आहे. याकडं दोन्ही राज्यातील शासनानं समन्वयानं पाहून महापूर येऊ नये यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत जल अभ्यासक विजयकुमार दिवाण यांनी यावेळी व्यक्त केले. कर्नाटक शासन नेहमी आडमुठ्या धोरण घेते यामुळे त्याचा फटका कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला बसून 2005 पासून आज पर्यंत चार वेळा महापूर आलेले आहेत इथून पुढे येणारे महापूर सामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत तर नरसिंहवाडी येथे होणाऱ्या पूर परिषदेला पूरग्रस्त नागरिकांनी उपस्थित राहून शासनाला पूर येणारच नाही यासाठी उपाययोजना करण्यासाठी भाग पाडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनावर दबाव आणावा यासाठी पूरपरिषद घेण्यात येणार असून नागरिकांनी या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आंदोलन अंकुश चे धनाजी चुडमुंगे यांनी केले. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, सांगली कृष्णा पुर नियंत्रन कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, प्रदीप वायचळ, संजय कोरे, सुयोग हावळ , महादेव कोळी, राकेश जगदाळे,बाबार महिपती,दीपक पाटील आदि उपस्थित होते.