Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

कुरुंदवाड शहर व ग्रामीण पत्रकार संघाचा मुरगुड पत्रकार हल्ल्याच्या निषेधार्थ पोलीस ठाण्यावर मोर्चा. माजी नगराध्यक्ष जमादार याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर पत्रकारांचा आक्रोश.



 कुरुंदवाड शहर व ग्रामीण पत्रकार संघाचा मुरगुड पत्रकार हल्ल्याच्या निषेधार्थ पोलीस ठाण्यावर मोर्चा.

माजी नगराध्यक्ष जमादार याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर पत्रकारांचा आक्रोश.

   दत्तवाड -- --  मुरगुड येथील सकाळचे पत्रकार प्रकाश तीराळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कुरुंदवाड शहर व ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निदर्शने करत त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सपोनि रविराज फडणीस यांना निवेदन देण्यात आले.

      शहर व परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

       मुरगुड येथील सकाळचे पत्रकार प्रकाश तीराळे यांनी गुरुवारी नऊ तारखेला दैनिक सकाळ मधून बातमी प्रसिद्ध केली होती. त्या बातमीची माजी नगराध्यक्ष जमादार यांचा काहीही संबंध नसताना पत्रकार पिराळे मंदिर चौकात दुचाकीवरून जात असताना त्यांना अडवून. बातमी का छापली असा जाब विचारत शिवीगाळ केली.त्यावेळी त्यांच्या चालक व एका कार्यकर्त्यांने त्यांना धरून ठेवले आणि त्यांच्या श्रीमुखात भडकवली.या घटनेचा राज्यभर पत्रकारातून पडसाद उमटले असून जमादार यांचा सर्वत्र निषेध होत आहे.

           येथील कुरुंदवाड शहर श्रमिक व ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आज सकाळी शिवतीर्थ जवळ सर्व पत्रकार एकत्र आले तेथून जमादार यांच्या निषेदाच्या घोषणा देत मोर्चा आणि पोलीस ठाण्यावर आले. यावेळी राजगोंडा पाटील, मिलिंद देशपांडे, संजय सुतार, रवींद्र केसरकर, सुनील संकपाळ,रमेश सुतार आदींनी आपल्या मनोगतातून  माजी नगराध्यक्ष जमादार व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी बातमी छापल्याच्या रागातून पत्रकारास मारहाण केल्याचे कृत्य निंदनीय असून जिल्हा पोलीस प्रमुखांनी गुंड प्रवृत्तीचे राजेखान जमादार आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांच्यावर  पत्रकार मारहाण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली.    

   


यावेळी विनोद पाटील,नंदकुमार सुतार,अकतर मकानदार,सुनील संकपाळ,भुपाल मुगळे,विजय सूर्यवंशी,अंकुश पाटील  ,दगडू कांबळे,अनिल केळीपाळे,महादेव शाहपुरे,इसाक नदाफ,मुन्ना नदाफ,शहानवाज अपराज,युनूस लाडखान,गणेश पाखरे,दिगंबर कदम, बाबासो मोरे,संदीप इंगळे,संजय कोकणे, उत्तम भोई,दिलीप कोळी,संतोष तारळे,मेहताब चंदुरे,संजय गायकवाड, कुणाल कांबळे,रमेश मिठारे,राहुल चौगुले,युवराज पाटील,मुस्तक अपराध,जमीर पठाण आदी ग्रामीण पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होत.