कवींनी सतत लिहीत राहावे - प्राचार्य राजेंद्र लोखंडे नरेंद्र विद्यापीठ संस्थेचा पुरस्कार वितरण कार्यक्रम उत्साह संपन्न
कवींनी सतत लिहीत राहावे - प्राचार्य राजेंद्र लोखंडे
नरेंद्र विद्यापीठ संस्थेचा पुरस्कार वितरण कार्यक्रम उत्साह संपन्न
कोल्हापूर - नरेंद्र विद्यापीठाचे वार्षिक पुरस्कार वितरण कार्यक्रम करवीर नगर वाचनालयाच्या वाडीकर सभागृहात उत्साहात पार पडला . प्रमुख पाहुणे म्हणून महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र लोखंडे होते.
कवी हा संवेदनशील मनाचा असतो त्याने कायम लिहीत राहावे असे भावपूर्ण उद्गगार प्राचार्य लोखंडे यांनी काढले.
यावेळी (स्वर्गीय न ना देशपांडे उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार )सीसीटीव्हीच्या गर्द छायेत, - गितेश गजानन शिंदे ठाणे, आवरसावर -बबन सराडकर अमरावती, आत्ममग्न- मंदार ओक चिपळूण, अव्यक्ताचे रंग- अनिता देशमुख पुणे, आतून उगवलेल्या कविता- प्रा. प्र द कुलकर्णी नाशिक तिच्या जगण्याची कविता होताना - वनिता जांगळे पेठ, स्नेहसखी- स्नेहा घाटे बंगळूर यांना प्रदान करण्यात आला तर (स्वर्गीय वा .गो कुलकर्णी चिक्कोडीकर उपक्रमशील शिक्षक पुरस्कार) नसीम इकबाल जमादार पन्हाळा, (सेवावृत्ती स्वर्गीय सौ जानकी न जोशी खडकलाटकर सेवा गौरव पुरस्कार ). अनघा परांडकर कराड (ज्येष्ठ स्वातंत्र्य स्वर्गीय न वा जोशी खडकलाटकर सेवा गौरव पुरस्कार)
श्रीकांत नाईक गडहिंग्लज, (स्वर्गीय दमयंती नरेंद्र देशपांडे राशिवडे कर गृहिणी गौरव पुरस्कार) सुमन शशिकांत जोशी कोल्हापूर यांना प्रदान करण्यात आला यावेळी प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार ,गिरीजा गोडे ,मनीषा शेणई, गणेश गावकर यांना कृतज्ञता पत्र प्रदान करण्यात आले तर यावर्षी घेण्यात आलेल्या पाऊस या काव्य लेखन स्पर्धेचे प्रथम क्रमांक अशोक भोईटे कोल्हापूर, द्वितीय क्रमांक विभागून प्रवीण रायबागकर, कल्याणी आडत कोल्हापूर तृतीय क्रमांक विभागून स्वाती कुलकर्णी इचलकरंजी ,वेदा गोखले सांगली तर उत्तेजनार्थ साहिल इंगळे, चंदन सोनई, रोहिणी मालगावे ,राजकन्या सातपुते यांना देण्यात आला.
आठवणीतील नरेंद्र विद्यापीठ संस्थेचा कार्यक्रम निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक. विभागून - अर्चना पानारी कोल्हापूर, दीप्ती कुलकर्णी कोल्हापूर, द्वितीय क्रमांक विभागून -प्रियदर्शनी चोरगे कोल्हापूर ,अनिल चव्हाण कोल्हापूर, तृतीय क्रमांक वैशाली पाटील पाडळी खुर्द यांना देण्यात आला .
प्रथम स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अरविंद देशपांडे यांनी केले पाहुण्याचा परिचय पी एन देशपांडे यांनी करून दिला यावेळी सुनील करगुपीकर, विणा कुलकर्णी, कुमार तोडकर, अंजली कुलकर्णी, प्राध्यापिका अर्चा देशपांडे राजेंद्र कुलकर्णी, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आभार मिलिंद देशपांडे यांनी मानले . सूत्रसंचालन मनीषा शेणई यांनी केले.