*मराठी शाळेतच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होतात - खंडेराव जगदाळे*
कुरुंदवाड (प्रतिनिधी):---
मातृभाषेत शिकलेली मुले 95 टक्के यशस्वी होतात. आई वडील म्हणजे देव असतात .रोज नित्यनियमाने आई-वडिलांच्या पाया पडावे .शिकल्याने नोकरी मिळत नाही तर कोणताही एका कलेचा कोर्स करावा लागतो. कोणतीही संस्था , शाळा उर्जित अवस्थेत येण्यासाठी टीमवर्क फार महत्त्वाचे असते . टीमचा म्होरक्या श्रीकृष्णासारखा लागतो असे उद्गार संस्थेचे चेअरमन पराडकर यांच्याविषयी काढले .
येथील शिक्षण प्रसारक मंडळ कुरुंदवाडच्या कै. डॅा.रामचंद्र विठ्ठल फडणीस व कै. सौ. जानकीबाई रामचंद्र फडणीस प्राथमिक विद्या मंदिर कुरुंदवाड व चंद्रकला बालक मंदिर ," शाळा वर्धापन दिन ,पारितोषिक वितरण समारंभ ,वर्गकक्ष नामकरण सोहळा " असा संयुक्तिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात खंडेराव जगदाळे बोलत होते.
संस्थेच्या सेक्रेटरी.सीमा जमदग्नी व संचालिका श्रद्धा कुलकर्णी प्रमुख उपस्थित होत्या.
कै. रामचंद्र दत्तात्रय कुलकर्णी व कै.वंदना रामचंद्र कुलकर्णी दत्तवाडकर यांच्या स्मरणार्थ श्री.पी.आर.कुलकर्णी यांनी वर्ग कक्षासाठी पाच लाख रुपये बहुमोल राशी दिले त्याचबरोबर कै.गजानन उर्फ अनिल नारायण पुजारी नृसिंहवाडी यांच्या स्मरणार्थ श्रीमती अस्मिता ग.पुजारी यांनी पाच लाख रुपये बहुमोल राशी वर्ग कक्षासाठी प्रदान केली . याचवेळी इयत्ता पहिली ते चौथीत प्रथम क्रमांकाने यश संपादन केलेल्या व चौथीतील आदर्श विद्यार्थी -विद्यार्थिनी यांनाही पारितोषिक वितरण करण्यात आले.
त्याचबरोबर संस्थेचे चेअरमन .प्रा..शरदचंद्र पराडकर यांनी संस्था व शाळेच्या प्रगतीविषयी व एस. पी. हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक पी.आर.कुलकर्णी यांनी शाळेबद्दल कौतुकोद्गार काढले व माझी मुलेही याच शाळेत शिकून आज मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर पदावरती कार्यरत आहेत असा उल्लेख केला. शाळेची माजी विद्यार्थिनी व अस्मिता पुजारी यांची कन्या अंतरा पुजारी आपले मनोगत व्यक्त केले
प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी काळे, विद्यासागर उळागड्डे ,अनिल पांडव , दत्तात्रय कुरुंदवाडे ,अनिता भोई , मिरामा बाणदार , सुनिल पवार , रेखा औरवाडे , श्रीमती मालूताई गुरव , श्रीमती सुनिता स्वामी , चंद्रकला बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका नीला कुलकर्णी, सुरेखा चिंदे , वर्षा भोसले , स्वाती पाटील व सलमा तहसीलदार तसेच या कार्यक्रमासाठी संस्था संचलित सर्व शाळांचे मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक बहुसंख्येने उपस्थित होते. कांचनमाला बाबर यांनी सूत्रसंचालन केले तर अनिता भोई यांनी आभार मानले .