दत्तवाडीतील गटारचे काम निकृष्ट चौकशीची मागणी
दत्तवाड
येथील माने नगर जवळील गटरच्या कामात सिमेंटचा वापर नसल्याने आज पाणी मारतानाच स्लॅप वाहून गेला त्यामुळे या कामाची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दतवाड तालुका शिरोळ येथील दत्तवाड शून्य ते दानवाड पर्यंत गटर चे काम चालू आहे. एक कोटी 81 लाख रुपयाच्या या कामात दत्तवाड काळमवाडी वसाहती समोर असून दानवाड रस्त्यापर्यंत या गटार होणार असून हाउसिंग सोसायटी माने नगर नेजे हायस्कूल बस स्थानक पर्यंतचे काम सध्या सुरू आहे. यातच माने नगर जवळ आत जाणाऱ्या रस्त्याला आठ दिवसापूर्वी गटारी स्लॅब घालण्यात आला होता मात्र त्यावर आज पाणी मारले असता त्यातून खडी व ग्रीट बाहेर आले. सिमेंट अजिबात नव्हते त्यामुळे सदर कामाची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांत होत आहे.
सिमेंट न घालताच ग्रिट व खडी घालून गटर्सवर स्लॅप टाकण्यात येत असल्याचे यामुळे निष्पन्न झाल्याने खाली बांधलेल्या गटारचा दर्जा कसा असेल याबाबत चौकशी करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे