महादेव नेर्ले यांचा अमृतमहोत्सवा निमित्त मान्यवरांकडून सत्कार
कष्टाशिवाय यश संपादन करता येत नाही हे कृतीतून दाखवून महादेव नेर्ले यांनी अनेक विद्यार्थ्याना घडवण्यासाठी आयुष्यभर कष्ट करून समाजासमोर आदर्श निर्माण आहे. त्यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले .
इचलकरंजी शहरातील रामगोडा पाटील शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक महादेव नेर्ले यांचा अमृतमहोत्सवा निमित्त मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला .
यावेळी शिवगोंडा पाटील , विद्याधर खिलारे दिलीप पाटील, दादासो पाटील ,डॉ. एस के नेर्ले, बाळासो निमणे मंगल नेर्ले, आशा हात्तरगी, मांतेश व ऋषिकेश नेर्ले, सुहास नेर्ले यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्य, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
