Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेत लिहिली. :. तारा भवाळकर



 दत्तवाड -- प्राचीन साहित्य संस्कृत मध्ये होते. संस्कृत ही विद्वानांची भाषा होती. संत ज्ञानेश्वरानी आपला ज्ञानेश्वरी ग्रंथ प्राकृत भाषेत लिहिला. प्राकृतिक भाषा अनेक प्रकारच्या आहेत. प्राकृत भाषा ही बोलीभाषा आहे. सर्व समान्यांची भाषा आहे. विविध प्रांतात ती बदलते. ती वेगवेगळी, अनेक प्रकारे बोलली जाते. सर्वसामान्यांना समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेत लिहिली. असे प्रतिपादन डॉ. तारा भवाळकर यांनी कुरुंदवाड येथे व्यक्त केले.

                                                                                            कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात त्या बोलत होत्या. "स्त्री पुरुष संतांचे क्रांतीकारत्व" हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी कवी मुक्तेश्वर साहित्य प्रतिष्ठानच्या सौ. अंजली कुलकर्णी होत्या.

 याप्रसंगी बोलताना डॉ. भवाळकर पुढे म्हणाल्या, नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. ही मराठी भाषा सर्वसामान्यात रुजली, बोलली पाहिजे. ११ व्या ते १७ व्या शतकातील काळ हा संतांचा काळ होता. या काळात संत साहित्य निर्माण झाले.

पंढरपूरचा विठ्ठल हा मुळचा कर्नाटक मधील. हम्पी येथील. तो कर्नाटकातून शैव परंपरेतून महाराष्ट्रात आला, मात्र महाराष्ट्रात त्यास श्रीकृष्णाशी जोडले गेले. तो वैष्णवाशी जोडला गेला. सर्वसामान्यांचा, शेतकऱ्यांचा देव म्हणजे विठ्ठल. पंढरपूरचे विठ्ठलाचे तीर्थक्षेत्र हे संतांचे लोकसाहित्याचे पार्लमेंट आहे. या संतांनी संत साहित्य समृद्ध केले आहे. हे संत साहित्य लोकसाहित्य, परमार्थिक साहित्य आहे. सर्व संत क्रांतिकारक होते.

       येथील श्री गणपती मंदिराच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात दीप प्रज्वलन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत, प्रास्ताविक प्रा. शरद पराडकर यांनी केले. परिचय डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी करून दिला. आभार सौ. सीमा जमदग्नी यांनी मानले.