दत्तवाड ग्राम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी सोसायटीच्या वतीने सभासदांना ११ टक्केने डिव्हिडंड वाटप
दत्तवाड : येथील दत्तवाड ग्राम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी सोसायटीच्या वतीने सभासदांना ११ टक्केने डिव्हिडंड वाटप करण्यात आले . यावेळी सोसायटीचे चेअरमन मलगोंडा पाटील , व्हा .चेअरमन विरुपाक्ष हेरवाडे , तज्ञ संचालक उदय पाटील , एन . एस .पाटील ,बाबासो माने ,अशोक बाबासो पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती .
सोसायटीस ७ लाख ४३ हाजार रुपये इतका नफा झाला असून सभासदांना ११ टक्के प्रमाणे डीव्हीडंड वाटप करून ठेविवरील व्याज ८ टक्के प्रमाणे एकंदरीत एकूण ५ लाख ८१ हाजार रुपये इतकी ठेवी वरील व्याजासहीत डिव्हीडंड सभासदांना वाटप करण्यात आले . या सोसायटीची स्थापना सन १९४७ रोजी झाले असून , आजरोजी या सोसायटीची पारदर्शक कारभार१०० टक्के कर्ज वसुलीची परंपरा जोपासून ऑडीट वर्ग 'अ ' असल्याचे सचिव राजगोंडा पाटील या कार्यक्रमावेळी सांगितले .
यावेळी बाबासो पाटील , विरगोंडा पाटील , धोंडीराम माने , गोरख कांबळे , संचालिका श्रीमती मंगल चौगुले , श्रीमती सुवर्णा पाटील व रावसो पाटील आणि कलगोंडा पाटील आदी संचालक सह क्लार्क राजगोंडा पिरगोंडा पाटील व मलगोंडा पाटील आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते .