*अनाथ वृध्दांची पण दिवाळी त्यांच्या सोबत करुया -बाबासाहेब पुजारी*
*अनाथ वृध्दांची पण दिवाळी त्यांच्या सोबत करुया -बाबासाहेब पुजारी*
दत्तवाड:प्रतिनिधी :हिंदू धर्मियांचा सर्वांत मोठा व आनंद व उत्साहाचा सण म्हणजे दिवाळी होय. दिवाळी सणासाठी मोठया प्रमाणात उलाढाल होत असते.आपल्या लोकांसाठी विविध प्रकारचे फराळ,कपडे व नवनवीन वस्तूंची खरेदी मोठया उत्साहात केली जाते. पण काही लोक या आनंदापासून वंचित राहतात त्यांनाही आपल्या नातेवाईक व स्वजनांसमवेत दिवाळीचा आनंद साजरा करण्याची इच्छा असते. पण ती मिळत नाही तर अशा लोकांची दिवाळी साजरी करण्यात आपणही योगदान दिले पाहिजे. ही मानवतेची संधी जानकी वृद्धाश्रम घोसरवाड ता. शिरोळ जि.कोल्हापूर यांनी उपलब्ध करुन दिली आहे.
जानकी वृद्धाश्रम कडून सर्व देणगीदार,हितचिंतक,मार्गदर्शक यांना विनंती करण्यात येते की आश्रमामधील निराधार,अनाथ वृध्द लाभार्थ्यांना दिवाळीचे फराळ व इतर साहित्य द्यायचे असेल तर कृपया आपण दिवाळीच्या अगोदर द्यावे.दिवाळी झाल्यावर दिल्यावर आश्रम मधील सर्वांचे खूप वय झाले कारणाने त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो.तरी आपण काही वस्तू,पदार्थ द्यायचे असतीलल तर थोडे पण ताजे द्यावेत अशी विनंती जानकी वृद्धाश्रमाचे संचालक बाबासाहेब पुजारी यांनी केले आहे.
ज्यांना शक्य असेल त्यांनी एक तास का होईना एक आजी,आजोबा ह्यांना पण दिवाळी आपल्यासोबत साजरी करण्यासाठी घरी घेऊन जाऊ शकता.आणण्याची व,सोडण्याची जबाबदारी जानकी वृद्धाश्रमामार्फत घेण्यात येईल..
जानकी वृद्धाश्रमातील वृध्द,अनाथ यांचे नातेवाईक येत नाही तर आपणच त्यांचे नातेवाईक होऊन ह्या वेळची दिवाळी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करुन अनाथांच्या व निराधारांच्या मनात माणुसकीचा, आनंदाचा खळाळता मायेचा झरा निर्माण करू या.यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जानकी वृध्दाश्रमाच्यावतीने करण्यात येत आहे.