Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

यड्रावकर साहेब मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पाच वर्षात तुम्ही काय केले? : राकेश कागले जरांगे पाटील यांची कधीही भेट का घेतली नाही ? : या निवडणुकीत मराठा समाज गणपतराव पटलांसोबत राहणार



 यड्रावकर साहेब मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पाच वर्षात तुम्ही काय केले? : राकेश कागले 

जरांगे पाटील यांची कधीही भेट का घेतली नाही ? : या निवडणुकीत मराठा समाज गणपतराव पटलांसोबत राहणार


घोसरवाड : 

          मराठा समाज्याच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आ. राजेंद्र यड्रावकरांनी पाच वर्षात काय केले ते जाहीर करावे, विधानसभेत किती प्रश्न विचारले? मराठा समाज्याची तालुक्यातील परिस्थिती काय आहे यावर कधी चर्चा केली? किती आंदोलनात सहभाग घेतला? याची माहीती तालुक्याला द्यावी अशी मागणी घोसरवाडचे उपसरपंच, युवा मराठा नेते राकेश कागले यांनी केली आहे.   

        ते म्हणाले यड्रावकरांनी तालुक्यातील किती कुटूंबांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आवाज ऊठवला? हे जाहीर करावे.  2019 साली मराठा समाज्याने तुम्हाला मराठ्यांचा उमेदवार विरोधात असताना सुद्धा मतदान केले, आपण आमदार झालात, मंत्री झालात पण मराठा आरक्षणावर तुम्ही बोलायला सुद्धा तयार नाही. यड्रावकर साहेब मनोज जरांगे साहेबानी मराठा आरक्षण आंदोलन सुरू केले त्यावेळी तुमची भूमिका मराठा समाजा सोबत का नव्हती याचे उत्तर आता आपण देणार काय? यड्रावकर साहेब मनोज जरांगे साहेबाना आपण जाऊन भेटून का आला नाही? किंवा आपल्या मतदार संघात जयसिंगपूर मध्ये मनोज जरांगे साहेब सभेला आले होते त्यावेळी आपण त्यांना आपन का भेटला नाही? यड्रावकर साहेब तुम्ही मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारच नसाल तर आम्ही मराठा म्हणून तुम्हाला का मतदान करायचे हे सांगा? असे म्हणत राकेश कागले म्हणाले या विधानसभा निवडणुकीत गरजवंत मराठ्यांची पोरं महाविकास आघाडी सोबत राहतील आणि आम्ही गणपतराव पाटील यांच्यासोबत राहणार आहे. 

         ते पुढे म्हणाले, गेल्या तीन चार वर्षात मराठा समाज्याने आपल्या शिरोळ तालुक्यात अनेक आंदोलने केली. तालुक्यातून सरकारला जाब विचारला पण त्या कोणत्याही आंदोलनावेळी तुम्ही आमच्या समाज्यासोबत का नव्हता? तुम्हाला मराठा आरक्षण महत्वाचे वाटत नसेल तर आम्ही तुम्हाला साथ का द्यायची? तुम्ही मराठा समाज्याच्या आरक्षणाच्या लढाईत कधीच सहभागी झाला नाही. तालुक्यात मराठा समाज्यातील कुटूंबाच्या किती कुणबी नोंदी सापडल्या त्या बघायलाही वेळ मिळाला नाही का?. तर मग तुम्हाला मराठा समाज्याने मतदान का करावे? आम्ही आत्ता गणपतराव पाटील यांना साथ देणार असल्याची घोषणाही उपसपरंच कागले यांनी केली आहे.