Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

खंडू भोरे यांची यड्रावकर यांच्याप्रचारात आघाडी



 दत्तवाड -

शिरोळ तालुक्यातील समाजासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भरघोस निधी दिला असून यातून विकासाची अनेक कामे झाली आहेत या ऋणातून मुक्त होण्याची वेळ आता आली असून यासाठी घोसरवाड सह तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन समाज बांधवांना मतदान करण्याची आव्हान करणार असून त्यांना भरघोस मतांनी निवडून येणार आहे असे. माधवराव घाडगे गटाचे कट्टर समर्थक व शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे माजी अध्यक्ष युवा सल्लागार खंडू भोरे  घोसवाड येथील प्रचार सभेत सांगितले त्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावातून समाजातील प्रत्येक मतदारापर्यंत पोचण्यासाठी प्रचारात आघाडी घेतली आहे.

शिरोळ तालुक्याचे आमदार यड्रावकर यांनी दोन हजार कोटी रुपयांच विकास निधी तालुक्यात आणून  सर्व गावांचा सर्वांगीण विकास सुरू केला आहे तो विकास तसाच पुढे चालावा यासाठी ते पुन्हा आमदार होणे गरजेचे आहे. हा विचार घेऊन प्रत्येक गावातील समाज बांधवांनी यड्रावकर यांना मतदान करावे यासाठी गावागावात जाऊन प्रचारात आघाडी मातंग समाजाचे शिरोळ तालुका संघटनेचे माजी अध्यक्ष खंडू भोरे यांनी आघाडी घेतली आहे.