Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

*पैशासाठी विकणाऱ्या अपक्ष उमेदवाराला मतदान करू नका - माजी आमदार राजीव आवळे*

 


दत्तवाड - 

मागील वेळी शिरोळ तालुक्यातील जनतेने अपक्ष आमदाराला पाठिंबा देऊ चूक केली ती यावेळी करू नका कारण तो पैशासाठी कुणाच्याही मांडीवर जाऊन बसतो व जनतेला विसरतो हे पाच वर्षात लक्षात आले आहे . सुरत मार्गे गुहाटीला जाताना तालुक्यातील जनतेला विचारले नाही त्यामुळे निष्ठावंत असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या गणपतराव पाटील यांना मतदान करा असे आवाहन  माजी आमदार राजीव आवळे यांनी केले. ते दत्तवाड ता. शिरोळ येथे अकिवाट जिल्हा परिषद मतदार संघ व दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघ या दोन मतदारसंघातील मागासवर्गीय ,मातंग, बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते. 

    ते पुढे म्हणाले विकास करणे हे लोकप्रतिनिधीचे काम आहे मात्र स्वतःला विकणे हा लोकशाहीचा अपमान आहे त्यामुळे मतदारांनी स्वतः विकून नये व स्वतःला विकून घेणाऱ्या लोकप्रतिनिधीला मतदान करू नये. यामुळे शिरोळ तालुका महाराष्ट्रात बदनाम झाला आहे. भाजपने केलेल्या पक्ष फोडीमुळे महाराष्ट्र देशात बदनाम झाला असून मागील अडीच वर्षात महाराष्ट्राची राजकीय अधोगती झाली आहे. पैशाच्या मस्तीवर राजकारण करणे व राजकारणातून पैसा मिळवणे हेच महायुतीच्या नेत्यांचे कार्य असून त्याला मतपेटीतून उत्तर देणे योग्य होणार असून येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करून महाराष्ट्राचा शाश्वत विकास करूया. असे ते म्हणाले .

अकिवाट व दतवाड जिल्हा परिषद मतदार संघातील मातंग समाजाने गणपतराव पाटील यांना जाहीर पाठिंबा यावेळी घोषित केला.

यावेळी संदीप बिरणगे ,वरून पाटील,उदय पाटील, शामराव बिरणगे यांनी मनोगत व्यक्त केली

   प्रथम स्वागत संदीप बिरणगे प्रास्ताविक रमेश बिरणगे यांनी केले. तर आभार राजगोंडा पाटील सुळकुडे यांनी मानले कार्यक्रमास जितेंद्र बिरणगे उत्तम कांबळे नवे दानवाड, दौलत माने सुरेश पाटील बाळगोण्णावर, शिवाजी बिरणगे, सुरज शिंगे, बाबू ऐवाळे, पवन कांबळे कृष्णा बिरणगे.   यांच्यासह अकिवाट व दतवाड जिल्हा परिषद मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.