पालकांनी पाल्याला वेळ द्यावा जे बी रई
जेडी न्यूज नेटवर्क दत्तवाड
विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालकांचा वाटा महत्त्वाचा असतो त्यामुळे स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांनी वेळ द्यावा असे आव्हान जे बी रई यांनी केले ते श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करताना पालक सभेत बोलत होते
येथील नेजे हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी व आठवी या वर्गातील शिष्यवृत्ती ला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसांची मार्गदर्शन कार्यशाळा जे बी रोही यांनी घेतली या दोन दिवसात इयत्ता आठवी व पाचवीच्या विद्यार्थ्यांना गणित सोडवण्याच्या विविध क्लुप्त्या बुद्धिमत्ता विषयी मार्गदर्शन याचबरोबर प्रश्न पत्रिका सोडवण्याचे तंत्र व मंत्र परीक्षेच्या वेळा व प्रश्न सोडवण्यासाठी लागणारा वेळ यासंबंधी सखोल मार्गदर्शन केले याबरोबरच शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या पालकांना मार्गदर्शन करून परीक्षेचे व अभ्यासाचे शाळा करत असलेली नियोजन याबद्दल सखोल मार्गदर्शन केले पालकांनी विद्यार्थ्यांसाठी वेळ द्यावा असेही त्यांनी आव्हान केले यावेळी मुख्याध्यापक संजय तावदारे आर बी पाटील उपस्थित होते प्रथम स्वागत व प्रास्ताविक परिवेक्षक बी बी रायनाडे, यांनी केले तर आभार पि के चौगुले यांनी मानले पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते