दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात आरोग्य व रक्तदान शिबिर उत्साहात
जेडी न्यूज नेटवर्क दत्तवाड
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत आज दिनांक नऊ रोजी महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन दतवाड चे सरपंच चंद्रकांत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ एस एम व्हटकर जाधव, डॉ चव्हाण उपसरपंच रूपाली पोवाडी प्रमुख उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालय दत्तवाड येथे आज आरोग्य विभागामार्फत महाआरोग्य शिबीर अंतर्गत सर्व रोग निदान शिबिर यात महिलांचे आरोग्य तपासणीवर भर देण्यात आला तर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याबरोबरच राज्यातून चालणाऱ्या या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे यांचे भाषण सर्वांना दाखवण्यात आले याबरोबरच दंतचिकित्सा विभाग याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बाबुराव पवार नूर काले सुरेश पाटील प्रकाश चौगुले रफिक मुल्ला बाळासो कोकणे यांच्याबरोबर सर्व ग्रामपंचायत कन्या केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक राजू जुगळे सर्व अध्यापक विद्यार्थी रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचारी रुग्ण गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते