बाहुबली येथे संघनायक उपसंघनायक पदाधिकारी प्रबोधन शिबिर संपन्न,*
*बाहुबली येथे संघनायक उपसंघनायक पदाधिकारी प्रबोधन शिबिर संपन्न,*
सन 2023 सालाकरता निवड झालेल्या संघनायक उपसंघनायक व पदाधिकारी यांचे प्रबोधन शिबिर बाहुबली ब्रह्म चरयाश्रम बाहुबली येथे संपन्न झाले....
या शिबिराचे उद्घाटन बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ चेसंचालक श्री गोमटेश बेडगे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे मुख्य महामंत्री व विराचार्य पतसंस्थेचे चेअरमन माननीय डॉक्टर अजित पाटील सर, विराचार पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अरुण कुदळे, बाल विकास व प्राथमिक विद्यामंदिर बाहुबलीचे अध्यक्ष तात्यासाहेब आथणे, बाहुबली ब्रह्मचर्याश्रम बाहुबलीचे अधीक्षक ए.ए.खाडे सर ,शांतीसागर क्रेडिट सोसायटी लिमिटेड शिरगुपी चे चेअरमन श्री सागर दुर्गे, व्हॉइस चेअरमन बाळासाहेब दाद गौडा पाटील, वीर सेवा दलाचे चेअरमन बाळासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन सुभाष मगदूम, कार्यवाह अजित कुमार भंडे, शिबिर विभाग प्रमुख अरुण भबीरे, कर्नाटक शिबिर विभाग प्रमुखअभय कुमार भागाजे, या शिबिराचे संयोजक प्रशांत बिरनाळे, तसेच मध्यवर्ती सदस्य, कोल्हापूर सांगली कर्नाटक विभागातील शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन पर मनोगत मध्ये बाहुबली विद्यापीठाचे व ब्रह्मचर्याश्रम चे संचालक श्री गोमटेश बेडगे सर यांनी वीर सेवादल व बाहुबलीचे जे अतुट नातं आहे. हे विशद केलं तसेच समंतभद्र महाराज व वीराचार्य यांच्या आठवणींना उजाळा दिला. व शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.
या शिबिरार्थींना पहिल्या सत्रामध्ये पहिलं पुष्प माननीय डॉक्टर अजित पाटील सर यांनी वीर सेवा दल काल आज आणि उद्या या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर सभेची स्थापना कशी झाली सेवा दलाची स्थापना कशी झाली याची माहिती शिबिरार्थींना देण्यात आली.
द्वितीय पुष्प बालभारती चे सदस्य व तज्ञ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र श्री दादासो अण्णा सरडे यांनी युवकांचे प्रबोधन, आदर्श युवक कसा असावा, आदर्श जीवनाची चतुसूत्री, व्यसनमुक्ती या विषयावर मार्गदर्शन केले.
तिसरे पुष्प बालब्रह्मचारी राजकुमार चौगुले सर कवठेसार यांनी विराचार्य, व्यसनमुक्ती व आदर्श युवक कसा असावा याविषयी मार्गदर्शन केले. वीर सेवादानाचे कार्यवाह अजितकुमार भंडे यांनीही नूतन संघनायक उपसंगनायक व पदाधिकाऱ्यांचे बरोबर संवाद साधला.
द्वितीय सत्राची सुरुवात राज्यपाल नियुक्त शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य या. डॉ.मनोज पाटील सर त्यांच्या मार्गदर्शनाने झाली सरांनी संघटन कसे असावे रूट लेवल ला जाऊन मायक्रो प्लॅनिंग कसं करावं संघनायक म्हणून मी काय केलं पाहिजे माझे कर्तव्य काय ,मला काय करायचं आहे ,माझं ध्येय काय आहे याचं अचूक मार्गदर्शन सिद्धांत शास्त्राशी निगडित केलं.
यावेळी पदवीधर संघटनेचे चेअरमन प्राध्यापक ए ए.मुडलगे सर व्हाईस चेअरमन प्रा.डी .डी मंडपे सर सेक्रेटरी प्रा. ए ए.मासुले सर माजी चेअरमन प्रा.एस डी अकोळे सर उपस्थित होते. यावेळी पदवीधर संघटनेमार्फत चालविले जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची माहिती व प्रवेशाची माहिती सेक्रेटरी ए ए मासुले सर यांनी दिली..
यानंतर विकलांग सेवाभावी संस्थेचे चेअरमन सतीश जांगडे नांदणी यांनी अपंगांना मिळणाऱ्या सोयीसुविधा याबाबत मार्गदर्शन केलं.
शेवटचे सत्रा मध्ये दक्षिण भारत जैन सभेचे सह खजिनदार मा.श्री अरविंद मजलेकर सर यांनी वीर सेवा दलाचे समाजाप्रती योगदान, आजची समाजाची सद्यस्थिती सेवा दलाला चांगले दिवस आणायचे असतील तर काय केलं पाहिजे, युवतींचे सक्षमीकरण खरोखरच झालं पाहिजे, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने कार्यरत रहा,समाजासाठी नतमस्तक व्हा. अशा विषयावर मार्गदर्शन केले..
या शिबिराचा समारोपासाठी दक्षिण भारत जैन सभेचे सह खजिनदार अरविंद मजलेकर सर, दक्षिण भारत जैन सभेचे बेळगाव विभागाचे महामंत्री मा. डॉ. रावसाहेब कुन्नुरे, कर्मवीर मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन कुमार पाटील, दक्षिण भारत जैन सभेच्या कोल्हापूर विभागाचे उपाध्यक्ष मा. भूपाल गिरमल सर, वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे मुख्य संघटक सुनील पाटील, सहकार्यवाह अभय पाटील, कर्मवीर मल्टीस्टेटचे सल्लागार व दिगंबर जैन बोर्डिंग इचलकरंजी चे सुपरिटेनडेंट. श्री पार्श्वनाथ पाटील सर वीर सेवा दलाचे चेअरमन बाळासाहेब पाटील प्रांतीय विभाग प्रमुख अनिल पाटील मजरेवाडी, दीपक मगदूम सर, प्रकाश दानोळी, बाबासो शंभू राकेश चौगुले नरंदे अभिजीत शिंत्रे तसेच मध्यवर्ती सदस्य तालुका जिल्हा प्रांतीय सदस्य उपस्थित होते.या शिबिराचे स्वागत शिबिर विभाग प्रमुख अरुण भबीरे यांनी केले, प्रस्ताविक वीर सेवा दल मध्यवर्ती समितीचे व्हाईस चेअरमन सुभाष मगदूम यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रदीप मगदूम व सविंद्रपाटील सर यांनी केले आभार या शिबिराचे संयोजक प्रशांत बिरनाळे अकिवाट यांनी मांडले. शांती गीताणे राजकुमार ढोले यांनी शिबिरा थ्री मंत्रमुग्ध केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी समोशरण भोकरे कुंभोज, अनिल भोकरे ,आदिनाथ रत्नपारखी, अमर पाटील, शितल शेडबाळे, शितल कुरडे,प्रवीण शिरगुप्पे यांचे विशेष सहकार्य लाभले..