Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

जयसिंगपुरात शरद चे कृषी प्रदर्शन

जेडी न्यूज नेटवर्क दत्तवाड 


सहकाररत्न स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड नरंदे व शरद कृषी महाविद्यालय यांच्या विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने जयसिंगपूर येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरा शेजारील जागेत गुरुवारी राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाची सुरुवात होत आहे अशी माहिती आमदार आणि शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे, हे प्रदर्शन दिनांक 9 फेब्रुवारी 2023 ते 12 फेब्रुवारी 2023 अखेर सुरू राहील प्रदर्शनासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे असे सांगताना महापूर व त्यानंतर कोरोना महामारीची दोन वर्ष यामुळे जयसिंगपूर मध्ये यापूर्वी सातत्याने पाच वर्षे भरत असलेले शरद कृषी प्रदर्शन मागील तीन वर्षात भरवता आले नाही त्यामुळे आता होणारे कृषी प्रदर्शन भव्य व दिव्य प्रमाणात भरवले जाईल असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हंटले आहे, या संपूर्ण कृषी प्रदर्शनाचा इव्हेंट रिसोर्सेस इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सांगली यांच्या माध्यमातून होणार आहे, प्रदर्शनाच्या चार दिवसाच्या कार्यकाळातील प्रदर्शनाच्या आयोजनामध्ये या कृषी प्रदर्शनात 15 कंपन्यांच्या ट्रॅक्टरचे स्टॉल तसेच गाय, म्हैस, बैल यांच्या प्रदर्शनातील समावेशासह द्राक्ष, हळद व ऊस पीक स्पर्धा घेतल्या जाणार आहेत, लोकोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करून शेतीमध्ये विविध प्रयोग करून पिकांचे उत्पादन वाढवणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे, या कृषी प्रदर्शनामध्ये तांदूळ व धान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे, त्याचबरोबर पूरग्रस्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन, क्षारपड जमिनीमधून पीक उत्पादन, आंबा, झेंडू, पपई यासारख्या अनेक पिकांच्या उत्पन्नाबाबत मार्गदर्शन, ड्रोनद्वारे पिकांवर औषध फवारणी, बीट गोड ज्वारी आणि ओला कचरा यापासून इथेलाॅन निर्मिती, मशरूम उत्पादन कसे करावे याबाबतचे मार्गदर्शन देखील होणार आहे, प्रदर्शनास 350 स्टॉल धारक सहभागी होणार आहेत असे सांगताना हार्वेस्टर, ड्रिप इरिगेशन, शेती विषयक अवजारे, यंत्रसामुग्री, बी बियाणे, फर्टीलायझर, हरितगृहे, जैव विज्ञान, मत्स्यवस्थापन, पशु पैदास, कुक्कुटपालन, डेरी मशिनरी, अन्नधान्य साठवन प्रक्रिया यांंची माहिती देणाऱ्या स्टॉल बरोबरच शेतकऱ्यांविषयी सरकारी योजना, वेगवेगळ्या कंपन्यांची धोरणे, अनुदान, आणि पिक विमा याबाबत देखील प्रदर्शनात मार्गदर्शन होणार असल्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हंटले आहे, त्याचबरोबर प्रदर्शनाच्या चार दिवसाच्या कार्यक्रमात दररोज शेती तज्ञांना आमंत्रित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन पर व्याख्यानांचे आयोजन देखील केले जाणार असल्याचे संयोजकांनी म्हंटले आहे, शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक अवजारे, आणि उत्पादन वाढीसाठी केले जाणारे प्रयत्न याबद्दलची विस्तृत माहिती या प्रदर्शनातून मिळणार असून प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी डॉग शोचे आयोजन केले आहे, चार दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन माजी आरोग्य राज्यमंत्री आणि शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शेवटी केले आहे. या कृषी प्रदर्शनाच्या उदघाटन समारंभास विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात, कोल्हापूर जिल्हा परिषद कृषी अधिकारी भिमाशंकर पाटील, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका कृषी अधिकारी शंकर भोसले तसेच जयसिंगपूरचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी तैमूर मुलाणी तालुका कृषी अधिकारी अभिजीत गडदे, कृषी अधिकारी दीप्ती बावधनकर यांच्यासह शरद सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक यड्रावकर उद्योग समूहामधील सर्व आजी माजी संचालक, पदाधिकारी आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.