Breaking News
Loading...

Breaking News

6/recent/ticker-posts

महिला सन्मान योजनेची आजपासून सुरुवात एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत

 दत्तवाड 


     नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना एसटी बस प्रवासात 50 टक्के सवलत जाहीर केली होती त्याची अंमलबजावणी शुक्रवार दिनांक 17 पासून करण्यात येत असल्याचे पत्र जाहीर करण्यात आले असून याचा फायदा महाराष्ट्र राज्यातील महिलांना महाराष्ट्र राज्यातील  अंतर्गत प्रवास करताना सर्व प्रकारच्या एसटी बस मधून होणार असून इथून पुढेही नवीन निघणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनेतील बस प्रवासात याची अंमलबजावणी केली जाणार आहे याबरोबरच वय 5 ते 12 या वयोगटाला 50 टक्के सवलत असून वय 75 पुढील महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे याच्या अंमलबजावणीचे पत्रक शासनाने एसटी महामंडळाला दिले असून याचे तिकिटाचे पैसे शासन भरणार आहे