चि.सौ. कां.ऋतुजा व चि. रोहित यांचा शुभविवाह संपन्न.
चि.सौ. कां.ऋतुजा व चि. रोहित यांचा शुभविवाह संपन्न.
नृसिंहवाडी :शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे मा.चेअरमन - मारूती देवसो कोळी यांची पुतणी व विद्यमान संचालक - अशोक देवसो कोळी(अकिवाट) यांची सुकन्या चि.सौ.कां.ऋतुजा आणि चि. रोहित (श्री.सदाशिव रामाण्णा कोळी,विशाखानगर - कोल्हापूर यांचा भाचा व कै. शिवाजीराव औरसंगे यांचे द्वितीय सुपुत्र) यांचा शुभ विवाह प.पू. सदगुरु महादबा पाटील महाराज मंगल कार्यालय येथे रविवार दि.२३एप्रिल २०२३ रोजी संपन्न झाला.
वधूवरांना शुभ आशिर्वाद देण्यासाठी शिक्षण, सहकार,राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. भगवान कोळी,रमेश कोळी, अनिल ओमासे,विजय भोसले, विजय आरगे,मेहबूब मुजावर, विठ्ठल भाट,बाळासो कोळी, महंमद मुल्ला,अल्लाबक्ष नदाफ, सुनिल कोळी,विनोद माने, जयानंद बेरड,सहदेव माळी,दत्तात्रय कमते,हुसेन जमादार,दिलीप शिरढोणे, उपस्थित होते.