नृसिंहवाडीत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त श्री गुरुचरित्र पारायण सोहळा.
नृसिंहवाडीत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त श्री गुरुचरित्र पारायण सोहळा.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठात ( दत्तधाम) श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त मगंळवार दि.११ एप्रिल ते १८ एप्रिल अखेर सामुहिक श्री गुरुचरित्र वाचन पारायण सप्ताह,अखंड नाम,जप,यज्ञ सप्ताह,महाप्रसाद तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मगंळवार दि.११ रोजी ग्रामदेवता मानसन्मान,यज्ञभुमी पुर्वतयारी.दि.१२ रोजी मडंल स्थापना,अग्निस्थापना,स्थापित देवता हवन,श्री गुरुचरित्र वाचनास सुरुवात.दि.१३ रोजी नित्य स्वाहाकार,श्री गणेश याग,श्री मनोबोध याग.दि.१४ रोजी चंडी याग,दि.१५ रोजी स्वामी याग,दि.१६ रोजी गीताई याग,दि.१७ रोजी श्रीरुद्र याग,मल्हारी याग,दि.१८ रोजी बली पुर्णाहुती,सत्यदत्त पुजन व अखंड नाम,जप,यज्ञ सप्ताह सांगता व साडेदहा वाजता महाआरती होऊन महाप्रसाद होईल.
दैनदिंन कार्यक्रमामध्ये सकाळी आठ वाजता भुपाळी,सव्वाआठ वा. नित्यस्वाहाकार,साडेआठ ते दहा वा.सामुहिक श्री गुरुचरित्र वाचन,साडेदहा वा.नैवेद्य आरती,१०:४५वा.विशेष याग,दुपारी २ ते साडेपाच वाजेपर्यंत श्री दुर्गा सप्तशती,स्वामीचरित्र सारामृत पाठ वाचन,सांयकाळी सहा वा.औंदुबर प्रदक्षिणा,साडेसहा वा.नैवेद्य आरती,सात वा.विविध विषयावर मार्गदर्शन,साडेसात वा.नित्यसेवा व नित्यध्यान असे कार्यक्रम होतील.
सप्ताहकाळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक,सेवेकरी भक्तानी लाभ घ्यावा.तसेच ज्या भाविकाना सप्ताहाकाळात अन्नदान करण्यासाठी धान्य,वस्तु,पदार्थ,देणगी द्यावयाचे असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठाशी( दत्तधाम )संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.